पंतप्रधानांचा 'भ्रष्टाचारमुक्त भारत' तर मुख्यमंत्र्यांचा 'भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र- किरीट सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 12:54 PM2021-09-28T12:54:09+5:302021-09-28T13:07:06+5:30

घोटाळ्यांमध्ये ठाकरे सरकारमधील बारा मंत्रालयांचा संबंध आहे. मात्र त्यासंदर्भात आता मी सविस्तर बोलणार नाही. मंत्र्यांविरुद्ध तक्रार केली की ते गायब होतात किंवा रुग्णालयात दाखल होतात असे सध्याचे चित्र असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले

kirit somaiya anil parab hasan mushrif anand adsul pm modi | पंतप्रधानांचा 'भ्रष्टाचारमुक्त भारत' तर मुख्यमंत्र्यांचा 'भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र- किरीट सोमय्या

पंतप्रधानांचा 'भ्रष्टाचारमुक्त भारत' तर मुख्यमंत्र्यांचा 'भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र- किरीट सोमय्या

Next
ठळक मुद्देठाकरे सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे तो फोडून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू असेही सोमय्या यावेळी म्हणाले

 पाषाण (पुणे): 'माझ्यावर कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी घालण्यात आली होती. ती हटविण्यात आल्याचे तेथील जिल्हाधिकारी यांनी मला कळवले आहे. या बंदीला मी घाबरत नव्हतो, त्यामुळे तिथे जाणार आहे. मुश्रीफ यांच्याविरुद्ध तीन घोटाळे असून त्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya)  यांनी पुण्यात दिली.

घोटाळ्यांमध्ये ठाकरे सरकारमधील बारा मंत्रालयांचा संबंध आहे. मात्र त्यासंदर्भात आता मी सविस्तर बोलणार नाही. मंत्र्यांविरुद्ध तक्रार केली की ते गायब होतात किंवा रुग्णालयात दाखल होतात असे सध्याचे चित्र असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. काही दिवसांनी ठाकरे यांचे सर्व मंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल होणार काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'रचना कशीही असूदे पुणे महापालिकेत सत्ता भाजपच राखणार'; युतीसाठी मनसेचे नेते आग्रही

'सगळेच गायब झाले'-

सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख गायब, प्रताप सरनाईक गायब, असे सर्वजण पळून जात आहे. मात्र मी हसन मुश्रीफ यांना सोडणार नाही. त्यांच्यावर पूर्ण कारवाई होईपर्यंत मी पाठपुरावा करीन. आनंद अडसूळ यांचे विरुद्ध 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचे  सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात स्पष्ट झाले. त्यांच्याविरुद्ध राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

भ्रष्टाचारी नेते आजारी पडतात-

भ्रष्टाचाराचा वध करून महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करू असे सोमय्या यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री म्हणतात भ्रष्टाचार मुक्त भारत तर मुख्यमंत्री भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र म्हणतात. अगोदर भ्रष्टाचारात सापडलेले प्रत्येक नेते गायब व्हायचे. आता प्रत्येक भ्रष्टाचारी नेते आजारी पडतात. ठाकरे सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे तो फोडून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू असेही सोमय्या यावेळी म्हणाले.

पेंटरचे आयुष्य झाले बेरंग; मजुरीच्या पैशांसाठी केला खून

या वेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,  नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, संदीप खर्डेकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, उमा गाडगीळ, दीपक पोटे, स्वरूपा शिर्के, गणेश घोष, दत्ता खाडे, राजेंद्र येनपुरे, आदी उपस्थित होते.

Web Title: kirit somaiya anil parab hasan mushrif anand adsul pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app