'रचना कशीही असूदे पुणे महापालिकेत सत्ता भाजपच राखणार'; युतीसाठी मनसेचे नेते आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 12:14 PM2021-09-28T12:14:38+5:302021-09-28T12:24:11+5:30

आता पुण्यातील काही मनसे नेत्यांनी पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांत भाजपासोबत जाण्याचा आग्रह धरल्याचे दिसत आहे

bjp mns jagdish mulik vasant more pune mahapalika election | 'रचना कशीही असूदे पुणे महापालिकेत सत्ता भाजपच राखणार'; युतीसाठी मनसेचे नेते आग्रही

'रचना कशीही असूदे पुणे महापालिकेत सत्ता भाजपच राखणार'; युतीसाठी मनसेचे नेते आग्रही

Next
ठळक मुद्देयुतीबद्दल अंतिम निर्णय राज्याचे नेतेच घेतील अशी माहिती मुळीक यांनी दिली

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात. काही दिवसांपूर्वी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुण्याचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. आता पुण्यातील काही मनसे नेत्यांनी पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांत भाजपासोबत जाण्याचा आग्रह धरल्याचे दिसत आहे. भाजपसोबत गेल्यास चांगल्या जागा निवडून येतील आणि सत्ताही स्थापन करता येईल अशी आशा मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (mns vasant more) यांनी व्यक्त केली आहे.

'सध्या पुणे महानगरपालिकेत तीन सदस्यीय प्रभाग झालेले आहेत. दोन सदस्यीय प्रभागात मनसेची ताकद प्रचंड आहे. 2012 ला दोनच्या प्रभागात आमचे 29 नगरसेवक निवडून आले होते. 2017 मध्येही आम्ही आमचा मतदार टिकून राहिला आहे. दोनच्या प्रभागात आम्ही चांगल्या जागा निवडून आणू शकतो पण तीनच्या प्रभागात आम्ही काही प्रमाणात कमी पडू शकतो. अशात जर भाजपने युतीची हाक दिली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

पेंटरचे आयुष्य झाले बेरंग; मजुरीच्या पैशांसाठी केला खून

'....युतीबद्दल निर्णय वरिष्ठांचा'-

तर दुसऱ्या बाजूला भाजपने आगामी महापालिकाचे सर्व तयारी केल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (bjp jagdish mulik) यांनी दिली. पुढे बोलताना मुळीक म्हणाले, स्वबळावर लढण्याची भाजपने तयारी केली आहे. पण मनसेसोबत युती करण्याबद्दल भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर टीमचा असेल. पुण्यात कशीही रचना असूदेत सत्तेत भाजपच येणार. मागील काळात भाजपने चांगली कामे केली आहेत. युतीबद्दल अंतिम निर्णय राज्याचे नेतेच घेतील अशी माहिती मुळीक यांनी दिली. 

Web Title: bjp mns jagdish mulik vasant more pune mahapalika election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.