शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:54 IST

तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून दीड लाख हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरच्यांकडून वसूल केले

पुणे : कारागृह व सुधार सेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच भोवले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत तसेच वैष्णवीचा पती शशांक याला शस्त्र पुरविण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुपेकर यांची अखेर मुंबईत होमगार्डच्या उपमहासमादेशकपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बदली करताना सुपेकर यांचे हे पद अवनत करण्यात आले आहे. त्यामुळे सुपेकर यांच्यावर मोठी नामुष्की ओढविली आहे. 

अशातच जालिंदर मामांचा अंजली दमानिया यांनी आणखी एक कारनामा समोर आणला आहे. वैष्णवीच्या वडिलांकडून १ लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले. तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरच्यांकडून वसूल केले असल्याचे दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.  दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का? असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे. 

आमच्याकडून दीड लाख घेतले 

दरम्यान मुलीच्या रुखवतासाठी वैष्णवीच्या सासू आणि नणंदने सुपेकरांच्या पत्नीला ऑर्डर देण्यास सांगितल्याचे कस्पटे म्हणाले आहेत. आम्ही मुलीच्या रुखवतासाठी ऑर्डर द्यायला गेलो तर वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे ह्या दोघी म्हणाल्या की, रुखवताची ऑर्डर तुम्ही देऊ नका. आमचे पाहुणे जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी एकदम छान रुखवत बनवतात. तेव्हा तिच्या सासूने आमच्याकडून १ लाख रुपयांचा चेक घेतला. तसेच ५० हजार रोखही आमच्याकडून घेतले. 

सुपेकरांनी परवाना मिळवून दिला 

शशांक हगवणे आणि सुशिल हगवणे यांनी खोटे पुरावे देऊन २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळविला आहे. हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता. कारण त्यावेळी ठोस असं काही कारण नव्हतं. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस शहर दलामध्ये शस्त्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केला.  त्यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर हे होते. या अर्जाची खातरजमा करण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून त्यांचे मामे सासरे जालिंदर सुपेकर यांच्यावर होती. मात्र, त्यांनी दिलेल्या खोट्या पुराव्यांची पडताळणी झाली नाही. ही पडताळणी होऊ न देण्यामागे सुपेकर यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यावरती जालिंदर सुपेकर यांची सही देखील आहे. या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन शस्त्र परवाना मिळण्याकरीता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर करुन फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसanjali damaniaअंजली दमानियाMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय