शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी ५ ते ६ वर्षांपासून काँग्रेसच्या संपर्कात - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 9:27 PM

काँग्रेसच्या विचारांची भूमिका त्यांनी मान्य केल्यानं पक्षात त्याच स्वागतच आहे

ठळक मुद्देराजकारणात तरुणांना संधी द्यावी लागत नाही ती त्यांनी घ्यायची असते

पुणे: कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी गेली 5 ते 6 वर्षांपासून हे दोघे काँग्रेसच्या संपर्कात होते. पण त्यांनी कधी येण्याची भूमिका घेतली नाही. पण आत्ता त्यांनी काँग्रेसच्या विचारांची भूमिका मान्य केलेली दिसत आहे. आज काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून तर ती खाली खाली येत आहे. अशा वेळी जर ही मंडळी येत काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. असं मत यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

''राज्यात काँग्रेस शिवसेनेबरोबर जात असताना काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रॅम स्वीकारला आहे. त्यामुळे काँग्रेसने हिंदुत्ववादी अशा काही भूमिका नाही असं देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं.'' ''ज्याच्या हातात सत्ता होती त्यांना योग्य चालवता आली नाही म्हणून तिन्ही पक्षांना कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र यावं लागलं. केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असल्याचं ते म्हणाले आहेत.''

तरुणांना संधी द्यावी लागत नाही ती त्यांनी घ्यावी लागते 

''संधी ही घ्यावी लागते. सुशील कुमार शिंदे हे कोणालाच माहीत नव्हते संधी घेतल्यानंतर सगळ्यांना माहीत झालं की सुशीलकुमार शिंदे कोण आहे. म्हणून राजकारणात तरुणांना संधी द्यावी लागत नाही ती त्यांनी घ्यायची असते असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.'' 

राहुल गांधींच्या उपस्थितीत दोघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

दरम्यान दोन दिवसापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी या दोन युवा नेते आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यातील चर्चेमध्ये मध्यस्थी केली आहे. दरम्यान, या प्रवेशापूर्वी शहीद भगतसिंग पार्कमध्ये कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासोबत उपस्थित राहुल गांधींनी विरोधकांना एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :PuneपुणेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी