शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

‘कामधेनू’साठी जिल्ह्यातील २२७ गावांची निवड

By admin | Updated: June 8, 2015 05:40 IST

जिल्ह्याची दूध उत्पादनाची क्षमता वाढविण्याच्या प्रमुख उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कामधेनु दत्तक ग्राम योजने अतंर्गत सन २०१५-१६ साठी पुणे जिल्ह्यात २२७ गावांची निवड करण्यात आली.

पुणे : जिल्ह्याची दूध उत्पादनाची क्षमता वाढविण्याच्या प्रमुख उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कामधेनु दत्तक ग्राम योजने अतंर्गत सन २०१५-१६ साठी पुणे जिल्ह्यात २२७ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये पुढील वर्षभर राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती सारीका इंगळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात काही ठराविक गावांची कामधेनु दत्तक ग्राम योजनेसाठी निवड करण्यात येते. या योजनेत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये उपलब्ध असलेल्या जनावरांना जिल्हा प्रशासना मार्फत मोफत विविध प्रकारचे लसीकरण करण्यात येते, त्याचबरोबर वैरण व्यवस्थापण, शेण व्यवस्थापन आदी अनेक गोष्टीची शेतक-यांना माहिती देण्यात येत. पुणे जिल्ह्यात गेल्या आठ-दहा वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत असून, कामधेनु योजनेत निवड केलेल्या गावांच्या दूध उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शासनेने संंपूर्ण राज्यात ही योजना लागू केली आहे.यंदा पुणे जिल्ह्यात २२७ गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून, या गावांमध्ये वर्षभर राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जून अखेर पर्यंत निवड झालेल्या गावांमध्ये पशुपालक मंडळांची स्थापना करणे, १५ आॅगस्ट, २ आॅक्टोबर आणि २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन पशुपालकांसाठी प्रबोधन शिबिरे घेणे, आॅगस्ट, नोव्हेंबर आणि फेबु्रवारी महिन्यात जतनाशक शिबिर, गोचीड, गोमाशा निर्मुलन व वंध्यत्व निवारण व औषधोपचार शिबिरे घेणे, १५ जूनपूर्वी मान्सूनपूर्व लसिकरण मोहिम घेणे, जानेवारी-फेबु्रवारीमध्ये निकृष्ट चारा सकस करणे, जनावरांचे मलमुत्र व वाया गेलेल्या चा-यापासून खत व्यवस्थापन, डिसेंबरमध्ये पशुपालकांसाठी सहलीचे आयोजन करणे, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संकरीत वासरांचा मेळावा व दुग्ध स्पर्धेचे आयोजन करणे आणि एप्रिल २०१६ मध्ये योजनाचे अंतिम सर्वेक्षण करुन फलश्रुती अहवाल सादर करण्यात येणार आहे.