मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा

By भाग्यश्री गिलडा | Updated: April 7, 2024 15:10 IST2024-04-07T15:09:54+5:302024-04-07T15:10:28+5:30

मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून त्याचे संबंध दहशतवादाशी आहे असे म्हणत फसवणूक केली

Jyeshtha was scammed by pretending to be speaking from Mumbai Crime Branch | मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा

मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे भासवून ज्येष्ठाला गंडा

पुणे : फेडेक्स कुरियर मधून बोलत असल्याचे भासवून तुमच्या नावाने मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून त्याचे संबंध दहशतवादाशी आहे असे म्हणत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अनुप जगनारायण उपाध्याय (वय- ५१, रा. उत्तमनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

अधिक माहितीनुसार, हा प्रकार ३ एप्रिल ते ६ एप्रिल या कालावधीत घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर कुरिअर ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स, पासपोर्ट, क्रेडिट कार्ड आणि लॅपटॉप असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मुंबई येथून तैवानला पार्सल पाठवण्यात आले आहे, त्यामध्ये अवैध वस्तू असल्याने मुंबई क्राईम ब्रांचमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. पार्सल मुंबई क्राईम ब्रांच मध्ये असल्याने तुम्हाला मुंबईला यावे लागेल असे  सांगितले. तुमचे नाव मणी लॉन्डरिंग मध्ये तसे दाऊद आणि पाकिस्तानी मंत्यांशी जोडलेले आहे असे सांगून भीती दाखवली. त्यानंतर स्काईप अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून खाते व्हेरिफाय करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली. बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या खात्यातील सगळे पैसे दिलेल्या बँक खात्यात पाठवा असे सांगून तक्रारदार यांना ३५ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात उत्तमनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक कदम पुढील तपास करत आहे.

Web Title: Jyeshtha was scammed by pretending to be speaking from Mumbai Crime Branch