शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

राष्ट्रवादीच्या वतीने जुन्नरला आंदोलन : तहसीलवर हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 2:39 AM

जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाच्या धोरणाविरोधात जुन्नर तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली

जुन्नर : जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाच्या धोरणाविरोधात जुन्नर तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, जुन्नरच्या उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार, जुन्नर नगरपालिका गटनेते दिनेश दुबे, नगरसेवक भाऊसो कुंभार, फिरोज पठाण, नितीन गांधी, अक्षय मांडवे, जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पापाशेठ खोत, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे, जुन्नर शहर अध्यक्ष महेश शेटे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसो देवाडे, सुनील ढोबळे, अझीम तिरंदाज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सत्ताधारी भाजपा-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवून जनतेची व शेतकºयांची फसवणूक केली आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, महिला वर्ग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, ग्राहक अशा सर्वच घटकांमध्ये या शासनाबद्दल नाराजी आहे.केंद्र सरकारच्या नोटाबंदी व जीएसटी निर्णयामुळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे महागाईने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. म्हणूनच या राज्य सरकारच्या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी राज्यभर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे अतुल बेनके यांनी या वेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस