शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

सोशल मीडियावर कलाकृतींच्या दुनियेची सफर; उपलब्ध होणार लहान मुलांशी संबंधित साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:25 PM

वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या अभिरुचीसाठी नेमकी वाट चोखाळता येणे शक्य झाले आहे. ‘जस्ट राईट सिनेमा’ या वेब पोर्टलने मदतीचा हात पुढे केला आहे. लहान मुलांशी संबंधित साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ठळक मुद्देचित्रपटांच्या तुलनेत लघुपट हे अभिव्यक्तीचे नवीन आणि सशक्त माध्यम लोकप्रियतेच्या वाटेवरसंगीत, शिल्प, नृत्य, चित्र, नाट्य आदींशी संबंधित साहित्य, व्हिडिओ करण्यात आला समाविष्ट

पुणे : सोशल मीडियामधून मनोरंजन आणि माहितीचा खजिना खुला झाला असताना, त्यातून नेमके काय निवडावे, हा प्रश्न प्रत्येक कलाप्रेमीला पडत असतो. लघुपट, वेब सिरीज, नाटक यातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सद्य:स्थितीवर भाष्य होत असते. या कलाकृतींचा आस्वाद घेऊन समृद्ध होण्यासाठी वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या अभिरुचीसाठी नेमकी वाट चोखाळता येणे शक्य झाले आहे. अचूक निवड कशी करावी, यासाठी ‘जस्ट राईट सिनेमा’ या वेब पोर्टलने मदतीचा हात पुढे केला आहे. लहान मुलांशी संबंधित साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.चित्रपटांच्या तुलनेत लघुपट हे अभिव्यक्तीचे नवीन आणि सशक्त माध्यम लोकप्रियतेच्या वाटेवर आहे. मात्र, स्मार्ट फोन वापरणाºया अनेकांना मनोरंजनाचे हे माध्यम माहीत नसते. उत्तम लघुपट कवितेसारखे कमी वेळात उत्कृष्ट आशय आणि अनुभव मांडतात. यांची निर्मितीमूल्ये, तांत्रिक बाबी समजून घेण्याच्या दृष्टीने या वेब पोर्टलवर कलाप्रेमींसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  शिवा जोशी आणि मुक्ता चैैतन्य यांनी या वेब पोर्टलसाठी पुढाकार घेतला.चत्ौन्य म्हणाल्या, ‘लघुपट, सिनेमा, नाटक, वेब सिरीज याविषयी वाचायला, पाहायला मिळेल, असे व्यासपीठ मराठीत उपलब्ध नाही. वेब पोर्टलच्या माध्यमातून रसिकांसाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. प्रजासत्ताकदिनाचे औैचित्य साधून, वेब पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. दृकश्राव्य माध्यमातून संगीत, शिल्प, नृत्य, चित्र, नाट्य आदींशी संबंधित साहित्य, व्हिडिओ आणि इतर ऐवज येथे समाविष्ट करण्यात आला आहे.साहित्य, कला, संस्कृतीचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाliteratureसाहित्यPuneपुणे