चेष्टा मस्करीत त्यांनी युवकाला विहिरीत ढकलले, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 01:11 PM2020-05-08T13:11:01+5:302020-05-08T13:11:36+5:30

सात-आठ मित्र लॉकडाउन असल्याने चेष्टा मस्करी करत एकत्र बसले होते...

In a joking period they pushed youth into a well, drowning because he could not swim | चेष्टा मस्करीत त्यांनी युवकाला विहिरीत ढकलले, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

चेष्टा मस्करीत त्यांनी युवकाला विहिरीत ढकलले, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देशेलू येथील घटना;खुनाचा गुन्हा दाखल

चाकण : लॉकडाउन असल्याने सात-आठ मित्र चेष्टा मस्करी करत एकत्र बसले होते. मयत व आरोपी यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक वाद निर्माण झाला. त्याचा राग मनात धरून आरोपी योगेश पडवळ याने मयत दिलीप घावटे याला विहिरीत ढकलून खून केला.असल्याची माहिती म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली.
 याप्रकरणी गणपत विष्णू घावटे ( वय.५५ वर्षे, रा.शेलू,ता.खेड) यांनी दिलेल्या फियार्दीवरून येथील पोलीसांनी सांगितले की, दिलीप गणपत घावटे ( वय ३२ वर्षे, रा. शेलू ता. खेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेलू गावात बाबाजी पडवळ यांची विहीर असून या विहिरीत दिलीप घावटे यास चेष्टा मस्करीत योगेश प्रकाश पडवळ याने विहिरीत ढकलले. मात्र दिलीप यास पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. 
 पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून गु.र.न.६२१/२०२० नुसार
भा. द.वि.क.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.
-------------------------------------------------------

Web Title: In a joking period they pushed youth into a well, drowning because he could not swim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.