Pune Crime | दीड लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले; राजगुरुनगर बसस्थानकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 22:00 IST2023-03-23T21:56:14+5:302023-03-23T22:00:01+5:30
वृद्ध महिलेने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली ...

Pune Crime | दीड लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले; राजगुरुनगर बसस्थानकातील घटना
राजगुरुनगर (पुणे) : गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे चार तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना (दि. २० रोजी) राजगुरुनगर बसस्थानकात घडली आहे. याबाबत सीताबाई नथू कराळे (वय ७०, रा. पेठ-कारेगाव, ता. आंबेगाव) या वृद्ध महिलेने खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराळे यांना गुळाणी (ता. खेड) येथील सटवाजीबुवा यात्रेनिमित्त नातेवाइकाकडे जाण्यासाठी राजगुरुनगर बसस्थानकात दुपारी आल्या होत्या. हातातील पिशवीमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन पिशवीमधील १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. घरी गेल्यावर पिशवीतील दागिने चोरी झाल्याचे कराळे यांच्या लक्षात आले. दोन दिवसांनी या घटनेची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली. पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.