शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

कात्रज, बिबवेवाडीत दोन महिलांचे दागिने हिसकावले; एकाच टोळीने केले दोन्ही गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:06 IST

सणासुदीला महिला दागिने घालून घराबाहेर पडत असतात. ही संधी साधून सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले आहेत. कात्रज, बिबवेवाडी येथे काही वेळेच्या अंतराने दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वा सात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांच्या जोडीने हे दोन्ही गुन्हे केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहून स्पष्ट झाले आहे. मोटारसायकल चालकाने हेल्मेट घेतले होते़ तसेच पाठीमागे बसलेल्याने मास्क लावलेला होता़ त्यांनी वापरलेली मोटारसायकल नवीन असून तिला नंबरप्लेट नव्हती़ याप्रकरणी कात्रज येथे राहणाऱ्या एका ५६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्या व त्यांची बहीण या रविवारी सायंकाळी ७ वाजता भाजी आणण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे १२ ग्रॅम वजनाचे गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेले. ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील शिवशंभोनगर येथील युनिक स्कुलसमोर रात्री सव्वासात वाजता घडली.

त्यानंतर दुसरी घटना बिबवेवाडी येथील जेधेनगरमधील चिंतामणी हॉस्पिटलशेजारील उरसळ बंगल्यासमोर रात्री पावणे आठ वाजता घडली़ जेधेनगर येथे राहणाऱ्या ४२ वर्षाच्या महिला पतीसह चालत जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७१ हजार २५० रुपयांचे २६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले. सणासुदीला महिला दागिने घालून घराबाहेर पडत असतात. ही संधी साधून सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजBibvewadiबिबवेवाडीChain Snatchingसोनसाखळी चोरीWomenमहिलाtheftचोरीPoliceपोलिस