PMP बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला, हडपसर-आळंदी मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 20:02 IST2024-05-13T20:01:39+5:302024-05-13T20:02:33+5:30
आळंदी : पीएमपी बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधील पावणेतीन लाखांचे दागिने ठेवलेला पाऊच चोरट्याने चोरून नेला. शनिवारी (दि. ...

PMP बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला, हडपसर-आळंदी मार्गावरील घटना
आळंदी : पीएमपी बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधील पावणेतीन लाखांचे दागिने ठेवलेला पाऊच चोरट्याने चोरून नेला. शनिवारी (दि. ११) सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजताच्या कालावधीत हडपसर ते आळंदी मार्गावर ही घटना घडली.
याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी सकाळी साडेदहा वाजता हडपसर येथून इलेक्ट्रिक बसने निघाल्या.
दुपारी साडेबारा वाजता त्या आळंदी येथे उतरल्या. त्यावेळी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली ९.२ तोळे वजनाचे दागिने असलेला पाऊच पर्समध्ये नसल्याचे निदर्शनास आले. अज्ञाताने फिर्यादी यांच्या पर्सची चेन उघडून हा ऐवज चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.