शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

By नारायण बडगुजर | Updated: June 1, 2025 22:08 IST

लता हगवणे हिच्या नावावर असलेल्या जेसीबी मशीनचा व्यवहार करण्यात आला. प्रशांत येळवंडे यांनी हे जेसीबी मशीन खरेदी करण्याचा व्यवहार ठरला.

नारायण बडगुजर

पिंपरी - वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेला हगवणे कुटुंबावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी  त्यांचे जेसीबी मशीन जप्त करण्यात आले. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच याप्रकरणात प्रोडक्शन वाॅरंट काढण्यात आले आहे. 

प्रशांत अविनाश येळवंडे (३३, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी २९ मे रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे (दोघेही रा. भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी मुळशी तालुक्यातील भूकुम येथे आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील आणि नणंद करिष्मा यांच्यावर हुंडाबळी व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात १७ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पती, सासू-सासरा, नणंद, दीर यांना पोलिसांनी अटक केली. यातील पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे पोलिस कोठडीत आहेत. 

दरम्यान, लता हगवणे हिच्या नावावर असलेल्या जेसीबी मशीनचा व्यवहार करण्यात आला. प्रशांत येळवंडे यांनी हे जेसीबी मशीन खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबी मशीनसाठी घेतलेल्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा ५० हजारांची रक्कम प्रशांत येळवंडे हे शशांक हगवणेला देत होते. मात्र, शशांकने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशीन फिर्यादी येळवंडे यांच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेतले. फिर्यादी येळवंडे यांचा विश्वासघात करून त्यांच्या रकमेचा अपहार करून फसवणूक केली. येळवंडे हे संबंधित रक्कम किंवा मशीनची मागणी करण्यासाठी वारंवार गेले. त्यावेळी शशांक याने त्याच्या कमरेवरील पिस्तुलावर हात ठेवून पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात फिर्यादी येळवंडे यांना ११ लाख ७० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

पोलिसांचा न्यायालयाकडे अर्ज

शशांक आणि लता हगवणे यांच्या अटकेसाठी महाळुंगे पोलिसांनी प्रोडक्शन वाॅरंट जारी केले आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासकामी शशांक आणि लता यांना ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केला आहे. 

प्रोडक्शन वाॅरंट म्हणजे काय?

प्रोडक्शन वॉरंट म्हणजे, न्यायालयीन कोठडीत असलेल्या एखाद्या व्यक्तीला तपासकामी ताब्यात देण्यात येण्याबाबतचा जारी केलेला आदेश. हा आदेश विशेषतः तपासाच्या उद्देशाने किंवा खटल्यात हजर राहण्यासाठी दिला जातो.   

पोलिस ठाण्यात समोरासमोर चौकशी

दरम्यान, पोलिस कोठडीत असलेल्या नीलेश चव्हाण, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना रविवारी बावधन पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. तिघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली.

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे