इंदापूर शहर एमआयएम अध्यक्षपदी जावेद शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:04+5:302021-09-19T04:10:04+5:30

पक्षाच्या पिंपरी-चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकिल मुजावर व पुणे जिल्हाध्यक्ष फय्याज शेख यांच्या हस्ते ...

Javed Sheikh as Indapur City MIM President | इंदापूर शहर एमआयएम अध्यक्षपदी जावेद शेख

इंदापूर शहर एमआयएम अध्यक्षपदी जावेद शेख

पक्षाच्या पिंपरी-चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकिल मुजावर व पुणे जिल्हाध्यक्ष फय्याज शेख यांच्या हस्ते जावेद शेख व आझम पठाण यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी पश्चिम महाराष्ट्रचे प्रवक्ता धम्मराज साळवे, तसेच इंदापूर शहरातील वैभव सावंत, आकतर मुलाणी, सोहेल कोरबू, शाहीद शेख, तसेच पुणे व पिंपरीमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदापूर शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जावेद शेख म्हणाले की, लोकशाही मार्गाने वंचित व उपेक्षित घटकांतील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. तसेच, शहरात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात पदाधिकारी यांची निवड करणार आहे, असेही जावेद शेख यांनी सांगितले.

१८ इंदापूर

जावेद शेख व आझम पठाण यांना निवडीचे पत्र देताना एमआयएमचे पदाधिकारी व मान्यवर.

Web Title: Javed Sheikh as Indapur City MIM President