भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 20:01 IST2025-10-22T19:58:55+5:302025-10-22T20:01:02+5:30

मी कुठेही भारतीय जनता पार्टीचे नाव घेतले नाही. याउलट भाजपा नेतेच बेछुटपणे माझ्यावर आरोप करतात. मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावले तर मी त्यांच्याशी चर्चा करेन असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

Jain temple land dispute case in Pune: after BJP displeasure, Eknath Shinde will take action against Ravindra Dhangekar from Shiv Sena | भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

पुणे - शहरातील जैन बोर्डिंग जमीन वादातून केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ अडचणीत सापडलेत. कोट्यवधीच्या जमीन घोटाळ्याचा आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर लावला असून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. धंगेकरांच्या भूमिकेमुळे स्थानिक भाजपा नेते नाराज झालेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्याकडून धंगेकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. 

याबाबत रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. मी कुठल्याही भाजपाच्या नेत्याला टार्गेट केले नाही. ज्या ज्या वेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून, पुणेकर म्हणून मी बोललेच पाहिजे. अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. गुन्हेगारी असेल, सुरक्षा व्यवस्था असेल यावर आपण सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांनाच जाब विचारला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना थोडी जाब विचारता येईल. मागील आठवड्यात जैन मंदिराबाबत जी बातमी आली. त्यात बिल्डरांसोबत ज्यांचे संबंध आहेत त्यांना जाब विचारला आहे. पुणेकरांना याचा विचार करावा लागेल. देव धर्म जिथे गहाण ठेवले जात आहे तिथे मी बोललो नाही तर पुणेकर मला माफ करणार नाही याची मला जाणीव आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मी कुठेही भारतीय जनता पार्टीचे नाव घेतले नाही. याउलट भाजपा नेतेच बेछुटपणे माझ्यावर आरोप करतात. मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावले तर मी त्यांच्याशी चर्चा करेन. प्रत्येक वेळी युती धर्म आड येत असेल तर मी शिंदेंशी बोलेन. शिवसेना असेल, भाजपा असेल तर चुका दाखवणे त्यात काही गैर नाही. माझ्यावर कारवाईबाबत माहिती नाही. मी माझी बाजू मांडेन. एकनाथ शिंदे हे माझे नेते आहेत त्यांच्याशी बोलेन, भाजपाचा तळागाळातील कुठला कार्यकर्ता आला, त्याने मला सांगितले, धंगेकर तुम्ही चुकीचे करताय हे समजावले. तरीही यापुढे मी कुठल्याही नेत्यावर बोलणार नाही असंही स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिले आहे.

दरम्यान, जे प्रकार सुरू आहेत ते कुठेही लपून राहिले नाहीत. पुण्यातील गुन्हेगारी ही सत्ताधारी लोकांनी मोडून काढली पाहिजे. पुण्यात जैन समाजाची जी जागा आहे, त्या जागेवर गैरव्यवहार झालेत. कायदेशीर बाजू पाहिली पाहिजे. त्यात जे अडकलेत त्यांना जाब विचारला पाहिजे. शासकीय संस्थांचा पोरखेळ सुरू असेल तर त्याचा जाब विचारला पाहिजे असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं. 

 

 

Web Title : भाजपा की नाराजगी, एकनाथ शिंदे रवींद्र धंगेकर पर कर सकते हैं कार्रवाई।

Web Summary : रवींद्र धंगेकर ने भूमि विवादों पर भाजपा के मोहोल की आलोचना की, जिससे भाजपा नेता नाराज हैं। शिंदे, धंगेकर के खिलाफ कार्रवाई कर सकते हैं। धंगेकर ने अपने कार्यों का बचाव किया और कहा कि वह अपने नेता शिंदे के साथ इस मामले पर चर्चा करेंगे।

Web Title : Eknath Shinde may act against Dangekar due to BJP's displeasure.

Web Summary : Ravindra Dangekar criticized BJP's Mohol over land issues, angering BJP leaders. Shinde may take action against Dangekar. Dangekar defends his actions, stating he'll discuss the matter with Shinde, his leader.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.