निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे हात, पाय मोडणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 23:56 IST2018-12-19T23:56:10+5:302018-12-19T23:56:35+5:30

पोलीस खात्यातून निवृत्त झालेले पोलीस निरीक्षक एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करीत आहेत़

Jailed police officers who are under the control of retired police officers | निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे हात, पाय मोडणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद

निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे हात, पाय मोडणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे : निवृत्त पोलीस अधिकाºयाने विरोध केल्यावर त्यांचे हात पाय मोडणारा, तसेच दरोडा, जबरी चोरी असे २० हून अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या़ 

उदलसिंग दुधानी (वय २८, रा़ रामटेकडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे़ जवळपास तीन वर्षे तो विविध गुन्ह्यात फरार होता़ सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल घुगे व त्यांच्या पथकाला त्याला पकडण्यात यश मिळाले़ 

पोलीस खात्यातून निवृत्त झालेले पोलीस निरीक्षक एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करीत आहेत़ त्यांच्याकडे या दुधानी याने अधिक रुम मागितल्या होत्या़ त्याला या पोलीस अधिकाºयाने विरोध केल्यावर त्यांचे हात पाय मोडले होते़ त्यानंतर तो फरार होता़ कर्नाटकमध्ये तो पळून गेला होता़ त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी असे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत़.

Web Title: Jailed police officers who are under the control of retired police officers