जय शंकर! श्री शंकर महाराज समाधी स्थळी भक्तांचा जनसागर; अलोट गर्दीत फुलून गेलं समाधी स्थळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:18 IST2025-05-05T17:15:50+5:302025-05-05T17:18:50+5:30
दिवसभरातील लाखो शंकर भक्तांच्या आगमन आणि शंकर महाराजांचा जयघोषामुळे धनकवडीतील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते

जय शंकर! श्री शंकर महाराज समाधी स्थळी भक्तांचा जनसागर; अलोट गर्दीत फुलून गेलं समाधी स्थळ
धनकवडी: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि पुण्य नगरीचे शक्तीपीठ असलेल्या धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराजांचा समाधी सोहळा मोठ्या दिमाखात, उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला, दिवसभर भक्तांच्या अलोट गर्दीने परिसर फुलून गेला आहे.
सद्गुरू शंकर महाराज मठाचे देश विदेशातील लाखो शंकर भक्तांच्या ह्रदयात अढळ स्थान आणि मनात दृढ श्रद्धा आहे. समाधी ट्रस्टच्या वतीने मागील सात दिवसां पासून विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भजन, किर्तन, श्री. शंकर महाराजांची चरित्र भावकथा व भव्य रक्तदान शिबिराचे तसेच दिवसभरातील लाखो शंकर भक्तांच्या आगमन आणि शंकर महाराजांचा जयघोषामुळे धनकवडीतील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
शंकर महाराजांच्या ७८ वा समाधी सोहळ्यातील मुख्य दुर्गाष्टीमीच्या पुजेची सुरूवात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते समाधी स्नान व पुजाने सपंन्न झाली. रात्री १२ पासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या पहाटे ४.३० पासून समाधी दर्शन सुरू झाले, सांयकाळी पालखी सोहळ्याचा मठात समाधीस तीन प्रदक्षिणा धालून भजनाच्या गजरात भक्तांनी आनंद लुटला. यंदा समाधी सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आरती सेवा व दर्शन घेऊन हजेरी दिली. यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार निलम गोऱ्ऱ्हे, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने आदिंचा सहभाग होता. दिनांक ६ मे रोजी काल्याच्या किर्तनानंतर मठ महाराजांच्या विश्रांती साठी भवीकांना सकाळी ११ नंतर पुर्ण बंद राहील व ७ मे रोजी सकाळी नेहमी प्रमाणे सुरू होईल असे विश्वस्तांनी सांगितले.