शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी ‘आयटीएमएस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 14:28 IST

या सिस्टीमद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड करता येणार आहे.

ठळक मुद्दे४० कोटींची तरतूद : सीसीटीव्ही मॉनिटरिंगद्वारे वाहनांवर लक्ष आणि दंड वसुली

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातांमध्ये झालेली वाढ आणि वाहनांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे या मार्गावरुन जाणे धोकादायक ठरु लागले आहे. अपघातांना तसेच बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी आता महामार्गपोलिसांकडून  ‘इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’चा (आयटीएमएस) वापर केला जाणार आहे. या सिस्टीमद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड करता येणार असल्याचे महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले. महामार्ग पोलीस आता आयटीएमएस ही सिस्टीम राबविणार आहेत. द्रुतगती मार्ग एकूण ९४.५ किलोमीटरचा आहे. सहा पदरी असलेल्या या रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. हाय रिज्यूलेशनचे या सीसीटीव्हींचे मॉनिटरिंग केले जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरुन जाणाºया प्रत्येक गाडीचे मॉनिटरिंगही शक्य होणार आहे. कॅमेºयांद्वारे गाड्यांच्या नंबरप्लेट, त्यांचा वेग, लेन शिस्त पाळली जात आहे, की नाही यावर लक्ष ठेवता येणार आहे. सीसीटीव्हींच्या माध्यमातून गाडीच्या मार्गावरही लक्ष ठेवता येणार असून, आवश्यकता भासेल तसे अशा वाहनांना महामार्गावरच बाजूला घेऊन कारवाई करणे शक्य होणार आहे. नियमभंग करणाºया वाहनांच्या नंबरप्लेटवरुन वाहनचालक-मालकांना आॅनलाइन चलन देऊन दंड आकारणीही केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, सध्या हा प्रकल्प प्राथमिक अवस्थेत आहे. मुंबई-पुण्यातील अंतर कमी वेळेत कापले जावे आणि व्यापाराला चालना मिळावी याकरिता द्रुतगती उभारण्यात आला. गेल्या काही वर्षात या रस्त्यावरील प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे. चालू वर्षात ऑगस्ट अखेरीस ६३ अपघात झाले असून, यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेरीस ३४ अपघातांत ३८ जणांचा मृत्यू झाला होता. वाहनांचा अमर्यादित वेग आणि लेन शिस्त पाळली जात नसल्याने सर्वाधिक अपघात होत आहेत. अति वेगामुळे टायर फुटण्याच्या तसेच मोटारी उलटल्याच्याही घटना घडत असतात.  ..........महामार्ग पोलिसांनी या अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता जड वाहनांना शेवटच्या लेनमधून जाणे बंधनकारक केले आहे. तसेच काही काळ ड्रोनद्वारे रस्त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंतु, हा प्रयत्न अल्पकाळातच बंद करावा लागला. वाहनांच्या वेगावर नियंत्रण आल्यास तसेच लेनशिस्त पाळली गेल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. .......

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातPoliceपोलिस