Pune: पोलीस शिपायानेच पोलीस महिलेचे अर्धनग्न फोटो काढून दाखवले मित्रांना
By विवेक भुसे | Updated: August 25, 2022 17:43 IST2022-08-25T17:43:48+5:302022-08-25T17:43:55+5:30
महिलेची बदनामी करणाऱ्या पोलीस शिपायाला अटक

Pune: पोलीस शिपायानेच पोलीस महिलेचे अर्धनग्न फोटो काढून दाखवले मित्रांना
पुणे : महिला पोलीस शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिला वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तिचे अर्धनग्न फोटो काढून मित्रांना दाखवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एका पोलीस शिपायाला अटक केली आहे.
संदीप कुंडलिक जाधव असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. सध्या तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२०पासून सुरू होता. याबाबत एका महिला पोलीस अंमलदाराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व आरोपी हे एकत्र काम करीत असताना आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी त्याने इतर मुलींशी अनैतिक संबंध ठेवून फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली. त्यांना वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचे अर्धनग्न फोटो काढून ते मित्रांना दाखवून बदनामी केली. हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.