शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल तर 'महामहिम' त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नव्हे; अजित पवारांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 14:42 IST

एका कार्यक्रमात फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्या हाताने काढला त्यावर दिली प्रतिक्रिया

ठळक मुद्देराऊत आणि पाटलांच्या बोलण्याकडं माझं लक्ष नाही

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा आणि समर्पण अभियानाचे आयोजन करमुक्त आले आहे. त्याच निमित्ताने  कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्या हाताने काढला. यावर अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.  

''राज्यपाल महामहिम आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित नसल्याचं अजितदादा म्हणाले आहेत.ते आम्हाला शपथ देतात, तो त्यांचा अधिकार असतो. त्यांच्या अधिकारावर बोलण योग्य नाही. म्हणून अजित पवारांनी त्यांच्याविषयी बोलणं टाळलं आहे.''

 केंद्र आणि राज्य सरकारने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना. थेट राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली घेतल्याने, यामुळे एकच चर्चा रंगली आहे.  राऊत आणि पाटलांच्या बोलण्याकडं माझं लक्ष नाही  

''सध्या कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबरोबर, आरक्षण, निवडणुका, अशी अनेक कामं माझ्यासमोर आहेत. पाटील, राऊत कोण काय बोललं हरे मला खरंच माहित नाही. सध्या मी खूप कामात गुंतलो असल्यानं त्यांच्या बोलण्याकडं माझं लक्ष नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.''

पुण्यात खेळाडूंसाठी स्वामिंग टॅंक ओपन 

''पुण्यात खेळाडूंसाठी स्विमिंग टॅंक ओपन करण्याची परवानगी दिली आहे. फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या खेळाडूंनी टॅंक मध्ये जाण्याची परवानगी असणार आहे. अशी अट त्यांनी यावेळी घातली आहे.'' सिंहगड परिसर विकास आराखडा तयार; खालून - वर जाण्यासाठी ई वेहिकल सुरू करणार 

''सिंहगड परिसराचा विकास आराखडा तयार असून  ग्राउंड फ्लोअरची पोलीस चौकी, किल्ल्याला शोभेल असं दगडी काम आणि त्या बांधकामाची चौकी उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत 35 - 45 ई बस तयार आहेत. सिंहगडावर अनेक पर्यटक जात असतात. त्यामुळं प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गाड्यांसाठी 10 एकर जमिनीवर पार्किंग करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.''

प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू

''पीएमपीएमएलच्या प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू करणार आहे. पायथ्यापासून वर जाण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल. त्यासाठी तिकीटही आकारले जाणार असून स्थानिक युवकांना रोजगार सुरू व्हावा हा त्यामागचा उद्देश असणार आहे. स्थानिक युवकांना गाईड प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचंही ये म्हणाले आहेत.''

सिंहगड परिसरात टपऱ्यांना बंदी  

''अकरा महिन्याच्या करारवर चांगली दुकानं काढणार. तिथल्या स्थानिक लोकांना जागा देणार. कोणीही येऊन टपरी उभी करू शकणार नाही.  सुटसुटीत दुकानं उभी करणार असून वरच्या बाजूला पर्यटनात शिस्त आणणार असलायचं यावेळी सांगितलं आहे.''

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा