पुणे: पुण्यातील सोरतापवाडी येथे झालेल्या दीप्ती चौधरी प्रकरणाने पुणे जिल्ह्यात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून आले आहे. दीप्ती या इंजिनिअर विवाहितेच्या आत्महत्येमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हुंड्यासाठी छळ केल्याने दिप्तीने आत्महत्या केली. त्यानंतर सासरच्या मंडळींना अटकही करण्यात आली आहे. तसेच या गंभीर घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे.
दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात तिची सासू भाजपची सरपंच आहे. तर सासरे शिक्षक आहेत. यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या सासूबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच जरी असल्या तरी अशी घटना त्यांच्याकडून होणं निंदनीय असल्याचे चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
चाकणकर म्हणाल्या, दीप्ती चौधरी प्रकरणात उरळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहन चौधरी याच्याशी दीप्तीचा विवाह करून दिला होता. व्यवसायात आपल्याला घ्याव अशी मागणी चौधरी कुटुंबीयांनी केली होती. तसेच पहिली मुलगी झाली. अशा अनेक कारणांमुळे सासरच्या त्रासाला कंटाळून दीप्तीने आत्महत्या केली. ४ आरोपी सुरवातीला फरार होते. पोलिसांनी विशेष पथकं पाठवून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. परवा रात्री पती आणि सासू या दोघांना अटक केली असून ३१ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
गर्भलिंग चाचणी करणे गुन्हा आहे. गर्भपात कुठे झाला कोणी केला या चौकशीचे आदेश दिले आहेत. सासरच्या लोकांनी पैशाशी लग्न केलं आहे का? मुलीशी केलं आहे? असा प्रश्न सध्या पडत आहेत. आईपणाच्या लढाईत आम्ही पुढे आलो आहोत. सासरी नांदत असताना माहेरचे दरवाजे आम्ही उघडले आहेत. ३ नवीन कायदे जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात लागू झाले आहेत. बी एन एस कायद्यांतर्गत फाशीपर्यंत शिक्षा जाईल अशी देखील तरतूद केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी नक्की केली जाईल. त्या सासू सरपंच जरी असल्या तरी अशी घटना त्यांच्याकडून होणं निंदनीय आहे. पुणे जिल्ह्यातील गर्भलिंग चाचणीच्या केंद्रांची सुद्धा चौकशी केली जाईल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दिप्ती चौधरीचा विवाह रोहन कारभारी चौधरी याच्याशी झाला होता. लग्नामध्ये ५० तोळे सोने देण्यात आले होते. विवाहानंतर दि. 25 डिसेंबर 2019 पासून 24 जानेवारी 2026 दरम्यान दिप्तीला चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करण्यात येत होती. तसेच एक महिन्यानंतर तिला सासरकडून मानसिक व शारिरीक छळ सुरू झाला, तिच्या चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत तिचा छळ करण्यात आला. वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे घेतले जात होते. तसेच तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून दिप्ती हिस हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आत्महत्येस पती रोहन कारभारी चौधरी, सासू सुनिता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी व दीर रोहित कारभारी चौधरी (सर्व रा. कडवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे कारणीभूत असल्याचा आरोप आहे. आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर २०२५ मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या भाजप पक्षाकडून झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत.
Web Summary : Rupali Chakankar condemns the Sarpanch mother-in-law's involvement in Dipti Choudhary's dowry death. The victim faced harassment for dowry, leading to suicide. Police arrested the husband and mother-in-law; investigation ongoing.
Web Summary : रूपाली चाकणकर ने दीप्ति चौधरी की दहेज मृत्यु में सरपंच सास की संलिप्तता की निंदा की। पीड़िता को दहेज के लिए प्रताड़ित किया गया, जिससे उसने आत्महत्या कर ली। पुलिस ने पति और सास को गिरफ्तार किया; जांच जारी है।