VidhaSabha 2019 : पुण्यात आघाडीसाठी ‘पर्वती’ ठरणार कळीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:39 AM2019-09-23T11:39:23+5:302019-09-23T14:14:48+5:30

काँग्रेसचा पर्वती मतदार संघासह चार जागांसाठी आग्रह असून, आघाडीच्या पुण्यातील जागा वाटपामध्ये ‘पर्वती’ कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहेत.

issue of 'Parvati' to in alliance in the Pune | VidhaSabha 2019 : पुण्यात आघाडीसाठी ‘पर्वती’ ठरणार कळीचा मुद्दा

VidhaSabha 2019 : पुण्यात आघाडीसाठी ‘पर्वती’ ठरणार कळीचा मुद्दा

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची चार जागांची मागणी; कोथरूडमधून राष्ट्रवादीचा पळ; मनसे लढवण्याची शक्यता 

पुणे : पुण्यातील आठ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती, खडकवासला, वडगावशेरी आणि हडपसर या चार जागा लढविणार असल्याचे आणि काँग्रेसला शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेन्ट या तीन जागा व मित्र पक्षासाठी कोथरूड मतदारसंघ सोडल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (दि. २२) पुण्यात केली. परंतु काँग्रेसचा पर्वती मतदार संघासह चार जागांसाठी आग्रह असून, आघाडीच्या पुण्यातील जागा वाटपामध्ये ‘पर्वती’ कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहेत. तर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा मित्र पक्षाला सोडत येथून पळ काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच आघाडी-युतीच्या जागा वाटपांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील काही जागा सोडल्या तर बहुतेक सर्व जागांबाबत अंतिम निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. तर भाजप-सेनेच्या जागा वाटपाचा घोळ अद्यापही सुरूच आहे. यामुळेच अजित पवार यांनी रविवारी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पुण्यातील आठही जागा वाटपाचा निर्णय झाल्याचे घोषित करत उमेदवार कोणी असो पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याचे आदेश दिले. अजित पवार यांच्या घोषणेनंतर मात्र आघाडीतील काही मतदारसंघांतील तीव्र इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. 
दरम्यान, कोथरूड मतदारसंघ सध्या सत्ताधारी भाजपचा सर्वांत मजबूत बालेकिल्ला समजला जातो. आघाडीमध्ये आतापर्यंत कोथरूड मतदारसंघावर राष्ट्रवादी काँगे्रसचा दावा होता. 
सन २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा जोशी यांनी ही जागा लढवली, तर सन २०१४ मध्ये बाबूराव चांदेरे यांनी राष्ट्रवादी काँगे्रसकडून निवडणूक लढवली व काँगे्रसच्याउमेदवारापेक्षा अधिक मते मिळवली. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रस 
दोन्ही पक्षांनी कोथरूडमधून पळ काढला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हडपसर मतदारसंघ राष्टÑवादीने आपल्याकडे ठेवला आहे. परंतु, कॉँग्रेसच्या इच्छुकांना हा मतदारसंघ त्यांच्याकडे हवा आहे. त्यामुळे या जागेवरूनदेखील रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 
...........

२००९ मध्ये राष्ट्रवादीने लढवली होती जागा
४पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी गेल्या काही वर्षांपासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मेळावे, विविध विकासकामांची उद्घाटने, फ्लेक्स, बॅनरबाजी सुरू आहे. यामुळेच काँग्रेसने पर्वती मतदारसंघावर दावा केला आहे. परंतु सन २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसने आघाडीमध्ये ही जागा लढवली होती. 
..........

सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली. परंतु येथे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवाराला अधिक मते मिळाल्याने आता राष्ट्रवादीने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. 

४तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष सुभाष जगताप आणि अश्विनी कदम व त्यांचे पती नितीन कदम यांनी देखील पर्वती मतदारसंघासाठी जोरदार तयारी केली आहे. यामुळे आघाडीच्या जागावाटपामध्ये पर्वती मतदारसंघातील दोन्ही पक्षांतील तीव्र इच्छुक उमेदवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
..............
अद्याप जागा वाटपाबाबत निर्णय नाही
पुण्यातील आठ जागांबाबत राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी घोषणा केली असली तरी काँगे्रसच्या हाय कामांडकडून अद्याप कोणताही निरोप किंवा आदेश आम्हाला आलेला नाही. याबाबत येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुण्यातील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होईल. काँगे्रसतर्फे पुण्यातील आठपैकी पर्वती, शिवाजीनगर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेन्ट या चार जागांची मागणी करण्यात आली आहे. - रमेश बागवे, काँगे्रस शहराध्यक्ष

Web Title: issue of 'Parvati' to in alliance in the Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.