शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक

By अजित घस्ते | Updated: April 7, 2024 18:03 IST

मार्केटयार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जातीये

पुणे : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी गुढीपाडव्यानिमित्त आंब्यांची मोठया प्रमाणात आवक झाली होती. जवळपास १२ ते १४ हजार पेट्टीची आवक झाली आहे. त्यात रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री केली जात आहे. काही आडत्यांकडून रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असताना मात्र बाजार समितीचे याकडे दुर्लक्ष आहे.

अप्रतिम गोडीमुळे खव्वय्ये कोकणातील हापूसच्या हंगामाची वाट पाहत असतात. हंगाम बहरात आल्यामुळे सध्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात मोठ्या प्रमाणात कोकणासह परराज्यातील आंब्याची आवक होत आहे. काही आडतदार रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करत आहे. त्यामुळे नागरिकांची फिसवणूक होत आहे. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत अशा फसवणूक करणार्या आडत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश राज्यातील सर्व बाजार समित्यांना देऊन सुमारे चार वर्षे होत आले. मात्र, मार्केटयार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे.

विभागप्रमुख, गटप्रमुखांचा कानाडोळा

मार्केटयार्डात आंब्याच्या हंगामात प्रत्यक्ष झालेली आवक आणि कागदावर आवक यात मोठी तफावत असते. ग्राहकांची फसवणूक करणारे बहुतांश आडतदार हे परराज्यातील आंबा विक्री करतात. मात्र, आंबा हंगामात आडते आणि विभागप्रमुख, गटप्रमुखांच्या साटेलोट्यामुळे कारवाई केली जात नाही. परिणामी नागरिकांची फसवणूक होते. या प्रकारामुळे भविष्यात मार्केटयार्डातून नागरिक आंबा खरेदी करण्यासह आवकेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आडच्यांनी ग्राहकांना फसवणूक करू नये. जो आंबा आहे त्याच राज्यांचा आंबा नावाने विक्री करावी .

ग्राहकांची फसवणूक होवू नये यासाठी ३ अधिका-यांची नेमणूक केली आहे. यापुढे खबरदार रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री केली तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि परवाना रहद्द करण्याचे आदेश काढले आहेत. ग्राहकांनी ही चौकशी करूनच खरेदी करावी. - डॉ. राजाराम धोंडकर सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :PuneपुणेAlphonso Mangoहापूस आंबाMangoआंबाMarket Yardमार्केट यार्डfruitsफळेHealthआरोग्यKarnatakकर्नाटक