किरकोळ कारणावरून वाद घालत तरुणाच्या डोक्यात मारला लोखंडी पाईप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 16:31 IST2021-04-07T16:30:41+5:302021-04-07T16:31:27+5:30

वाद मिटवण्यासाठी बोलावून तरुणाला केली मारहाण

An iron pipe hit the young man in the head, arguing for a minor reason | किरकोळ कारणावरून वाद घालत तरुणाच्या डोक्यात मारला लोखंडी पाईप

किरकोळ कारणावरून वाद घालत तरुणाच्या डोक्यात मारला लोखंडी पाईप

ठळक मुद्देक्रिकेट खेळताना बॉल गाडीला लागण्यावरून झाला होता वाद

पिंपरी: किरकोळ कारणावरून तरुणासोबत वाद घातला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी बोलावून त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारला. त्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना केशवनगर चिंचवड येथे सोमवारी घडली आहे. 

प्रणव गावडे, अनिस गावडे, आशुतोष देवकर, प्रसाद कुलकर्णी (सर्व रा. चिंचवड), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संजोग संदीप पालांडे (वय २५, रा. केशवनगर, चिंचवड), असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने याबाबत मंगळवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालांडे त्यांची गाडी घरासमोर पार्क करून घरी जात होते. त्यावेळी क्रिकेट खेळत असलेल्या चौघांकडून बॉल त्यांच्या गाडीला लागला. त्यामुळे क्रिकेट खेळणा-याना समजावून सांगण्यासाठी ते गेले. त्यावेळी त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालांडे घरी निघून गेले. त्यानंतर या चौघांनी त्यांना फोन करून वाद मिटवण्यासाठी बोलवून घेतले. त्यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी पाईप डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

Web Title: An iron pipe hit the young man in the head, arguing for a minor reason