शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 : T-20 तील नंबर वन गोलंदाज पुण्याच्या संघात

By admin | Updated: March 23, 2017 21:49 IST

इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने दहाव्या सत्रात शार्दूल ठाकूरनंतर आणखी एका गोलंदाजाला करारबद्ध केलं आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 23 - इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने दहाव्या सत्रात शार्दूल ठाकूरनंतर आणखी एका गोलंदाजाला करारबद्ध केलं आहे. आयसीसीच्या T-20 आणि एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन असलेल्या द. आफ्रिकेच्या इम्रान ताहिरला पुणे संघाने करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर पुणे संघानी बदली खेळाडू म्हणून ताहिरला आपल्या चमूत घेतलं आहे. बंगळुरत झालेल्या लिलावप्रक्रियेत ताहिरला कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. गेल्या वर्षी ताहिरने दिल्ली संघाचे नेतृत्व केलं होतं. पुणे संघाने यापुर्वी मुंबई रणजी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला आपल्या चमूमध्ये घेतले आहे.आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दहा वर्षांतील ही अखेरची स्पर्धा आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील.आरपीएसचा संघ पुढीलप्रमाणे : महेंद्र सिंह धोनी, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, रविचंद्रन अश्विन, फाफ डू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, अ‍ॅडम जंपा, इम्रान ताहिर अंकित शर्मा, अंकुश बेन्स, अशोक डिंडा, बाबा अपराजित, बेन स्टोक्स, डॅनियल क्रिस्टियन, दीपक चाहर, ईश्वर पांडे, जसकरण सिंह, जयदेव उनाडकट, लोकी फर्ग्युसन, मनोज तिवारी, मयंक अग्रवाल, मिलिंद टंडन, राहुल अजय त्रिपाठी, राहुल चाहर, रजत भाटिया, सौरभ कुमार आणि उस्मान ख्वाजा.