शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळूउपसा सुरूच

By admin | Updated: August 25, 2015 04:36 IST

गेल्या आठ महिन्यात प्रशासनाने बेकायदा वाळूउपशाविरोधात वारंवार मोहिमा उघडल्या़ उपसा करणाऱ्या बोटी जाळल्या. जेटी, पोकलेन, ट्रक जप्त केले़ त्यांच्यावर

बारामती : गेल्या आठ महिन्यात प्रशासनाने बेकायदा वाळूउपशाविरोधात वारंवार मोहिमा उघडल्या़ उपसा करणाऱ्या बोटी जाळल्या. जेटी, पोकलेन, ट्रक जप्त केले़ त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली़ मात्र, पुन्हा त्या-त्या ठिकाणी अवैध वाळूउपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. कारवाईला आपण भीक घालत नसल्याचे वाळू माफियांनी दाखवून दिले आहे़ एका महिन्यापूर्वी वाळू माफियांनी केवळ वाळूउपसा करण्यासाठी नीरा नदीवरील बंधारा जिलेटिनचा स्फोट घडवून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तर, निंबूत छप्री परिसरातील घुमटवस्ती येथील पूल वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे तुटला. वाळू माफियांमुळे मोठे नुकसान होत आहे. मुरूम, मळशी, वाघळवाडी, निंबूत, वाणेवाडी, होळ, वडगाव निंबाळकर परिसरातील रस्त्यांची वाळूमुळे दुरवस्था झाली आहे. नीरा नदीपात्रातील वाळू उपसा करून बारामती, पुणे परिसरात विक्री करण्यात येते. पुणे शहरात वाळूला दुपटीने वाळूविक्री करण्यात येते. नदीपात्रातून ट्रॅक्टर, ट्रकद्वारे वाळूउपसा होतो. त्यानंतर १० चाकी ट्रकमध्ये ही वाळू भरून विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे चित्र आहे. महसूल, पोलीस यंत्रणेकडून वाळूउपशावर कारवाई केली जाते. मात्र, वाळू सम्राटांना कायमस्वरूपी चाप बसत नाही. बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर या तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा कऱ्हा, नीरा, भीमा या नद्यांच्या पात्रातून होतो. त्यामुळे नदीचे पात्र बदलले आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. (प्रतिनिधी)पुन्हा त्याच ठिकाणी वाळूउपसा... भीमा आणि नूरा या नद्यांनी पुणे, नगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमारेषा आखल्या आहेत़ त्यामुळे अनेकदा पुणे जिल्ह्यातील पथकाने कारवाईला सुरुवात केली की, वाळू माफिया नदीच्या पलिकडे दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आपला वाळूउपसा सुरु ठेवतात़ त्यामुळे आता संयुक्त कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत़ तरीही या कारवायांना वाळूमाफिया जुमानत नाही़ आज कारवाई केली गेली की, दोन दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून येते़