शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

अरुण भेलके चा कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडे यांचा एकमेकांशी परिचय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 8:35 PM

मिलिंद तेलतुंबडे हे भूमिगत असून एल्गार व माओवादी संबंध प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

ठळक मुद्देनक्षलवादी गोपी याची न्यायालयात साक्ष

पुणे : बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेचा सक्रिय सदस्य अरुण भेलके हा भूमिगत नक्षलवादी कॉ. एम. ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे यांच्यासोबत असायचा. तसेच त्याची पत्नी कांचन भेलके ही नक्षल भागातील संघटनेच्या सदस्यांना औषधोपचाराचे काम करत असे. अशी साक्ष गडचिरोलीतील शरणागत नक्षलवादी गोपी याने बुधवारी न्यायालयात दिली. त्याने भेलके याला न्यायालयासमोर ओळखले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.  मिलिंद तेलतुंबडे हे भूमिगत असून एल्गार व माओवादी संबंध प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. भेलकेने मुंबईत वास्तव्यास असताना आधार कार्डच्या अर्जावर एका नगरसेवकाच्या कार्यालयाचा पत्ता टाकून आदित्य पाटील नावाचे आधार कार्ड मिळविल्याचे तपासातून पुढे आले आहे. चंद्रपूर येथील बेकायदेशीर प्रतिबंधक हालचालींच्या गुन्ह्यात दोघांना जामीन मिळाला आहे. मात्र पुढील तारखांना हजर न राहता दोघेही नाव बदलून पुण्यात राहत होते. त्यांची माहिती मिळताच एटीएसने त्यांना दोन सप्टेंबर 2014 मध्ये अटक केली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळावा, अशी मागणी करणारा अर्ज कांचन हिने केला होता. न्यायालयाने मात्र तो फेटाळला आहे. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. 

* गोपी ऊर्फ निरंगीसाय दरबारी मडावी याची मंगळवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात साक्ष झाली. कांचन भेलके आजारी असल्याने तिला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. घरात झालेल्या भांडणामुळे गोपी नक्षलवादी संघटनेत सहभागी झाला. तेव्हापासून ते शरण गेल्यापर्यंतचा प्रवास त्याने न्यायालयास सांगितला. त्याने दिलेल्या जबाबास बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी विरोध केला. गोपी हा शरण आल्यापासून पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तो पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे साक्ष देत आहे, असा युक्तिवाद नहार यांनी केला. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील विकास शहा या खटल्याचे कामकाज पाहत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय