मुलाखत : विनाकारण घराबाहेर पडल्यास गय नाहीच : सुधीर हिरेमठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 07:00 IST2020-04-19T07:00:00+5:302020-04-19T07:00:10+5:30

पोलीस कारवाई टाळण्यासाठी घरातच थांबा

Interview: If you are out of the house without a reason, do not miss: Sudhir Hiremath | मुलाखत : विनाकारण घराबाहेर पडल्यास गय नाहीच : सुधीर हिरेमठ

मुलाखत : विनाकारण घराबाहेर पडल्यास गय नाहीच : सुधीर हिरेमठ

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याशी साधलेला संवाद... 

नारायण बडगुजर 
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहेत. लॉकडाऊनची अंमलबजाणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून गुन्हे दाखल होत आहेत. असे असले तरी पोलिसांच्याही सुरक्षेचा प्रश्न आहेच. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याशी साधलेला संवाद... 

लॉकडाऊनसाठी पोलिसांकडून काय उपाययोजना केली आहे? 
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नाकाबंदी करून चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकासोबत पोलिसांचेही पथक नियुक्त केले आहे. आयुक्तालयाकडे सध्या राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आहेत. आणखी एक तुकडी मिळाली आहे. काही रेल्वे पोलीस व २०० होमगार्ड बंदोबस्तासाठी उपलब्ध झाले आहेत.   

कोरोनाचे जास्त रुग्ण आढळलेल्या परिसरासाठी काय धोरण आहे?  
असा परिसर सील करण्यात येतो. तेथील नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येते. सकाळी १० ते साडेबारा दरम्यान कुटुंबातील एकाच व्यक्तीला जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची सवलत देण्यात येते. इतर कोणालाही या भागात प्रवेश नसतो.   
    
पोलीस स्वत: व कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी काय खबरदारी घेतात?  
कोरोनाचे रुग्ण जास्त असलेले भाग सील करण्यात आले आहेत. असा परिसर हॉटस्पॉट असतो. मात्र शहरात बंदोबस्तावर असलेल्या प्रत्येक पोलिसाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. ड्युटी संपल्यानंतर घरी गेल्यावर स्वच्छतेची काळजी घेतली जाते. कुटुंबात न मिसळता वेगळ्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली आहे. घरातही सोशल डिस्टन्स पाळले जाते. सॅनिटायझरचा वापर व निजंर्तुकीकरण केले जाते.

पोलिसांच्या कुटुंबियांना काय मदत होत आहे? 
पोलिसांच्या कुटुंबियांना किराणा व भाजीपाला घरपोहच देण्यात येत आहे. सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोव्हज यासह किराणा व धान्याचे किट तयार केले आहे. ते देखील या कुटुंबियांना वाटप करणार आहे. 
 

बंदोबस्तावरील पोलिसांचे काय?
बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी कक्ष उभारले असून, खूर्ची, जेवण, पाणी आदी पोलिसांना पुरवले आहे. तसेच पीपीई किट, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज आदी सुरक्षा साधने त्यांना  दिली आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी पुर्णपणे खबरदारी घेण्यात येत आहे.  

.......................

काही पोलिसांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. आवश्यकतेनुसार पोलिसांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना दिल्या जातात. नागरिकांनी घरातच थांबावे कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. शहरातील हॉटस्पॉटवर शासनाच्या निदेर्शानुसार उपाययोजना होत आहेत. अशा ठिकाणी कारवाई अधिक प्रभावी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. कारवाई केलीच जाईल, ही कारवाई व कोरोना टाळायचा असेल तर नागरिकांनी घरातच थांबावे.
- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: Interview: If you are out of the house without a reason, do not miss: Sudhir Hiremath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.