पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसचे तिकीट १५ जुलैपासून काढता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:52 IST2022-07-15T10:51:19+5:302022-07-15T10:52:25+5:30

१५ जुलैपासून रेल्वे स्थानकावर अथवा ऑनलाइन आरक्षण करता येणार

Intercity Express tickets can be purchased from July 15 | पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसचे तिकीट १५ जुलैपासून काढता येणार

पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेसचे तिकीट १५ जुलैपासून काढता येणार

पुणे :पुणे-सोलापूर इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस येत्या १८ जुलैपासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली होती. या एक्स्प्रेसने ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे त्यांना १५ जुलैपासून रेल्वे स्थानकावर अथवा ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे.

१८ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता १२१६९ पुणे - सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. तर १२१७० सोलापूर - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून दुपारी दोन वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

दौंड, जेऊर आणि कुर्डुवाडी या रेल्वे स्थानकावर ही एक्स्प्रेस थांबेल अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

Read in English

Web Title: Intercity Express tickets can be purchased from July 15