पुणे जिल्ह्यातील पुलांची तपासणी करा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:25 IST2025-06-17T13:24:14+5:302025-06-17T13:25:44+5:30

तपासणीदरम्यान पुलांमध्ये काही दोष आढळल्यास त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते. त्यासाठी संबंधित पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Inspect bridges in Pune district, instructions from Chief Engineer of Public Works Department Atul Chavan | पुणे जिल्ह्यातील पुलांची तपासणी करा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या सूचना

पुणे जिल्ह्यातील पुलांची तपासणी करा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या सूचना

पुणे : जिल्ह्यातील कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांसह गेल्या काही वर्षांत बांधण्यात आलेल्या पुलांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, नियमानुसार दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वच पुलांंची तपासणी करण्यात येत असते. तपासणीदरम्यान पुलांमध्ये काही दोष आढळल्यास त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते. त्यासाठी संबंधित पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात ८१ मोठे पूल असून, त्यापैकी २५ पूल हे ब्रिटिशकालीन आहेत. या पुलांमध्ये जिल्ह्यात ३० मीटरपेक्षा जास्त लांबीचे ८१ मोठे पूल आहेत. त्यापैकी २५ पूल हे ब्रिटिश काळामध्ये बांधण्यात आले आहेत. ब्रिटिशकालीन पुलांपैकी ८ पूल हे शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांचे झाले आहेत. जिल्ह्यातील एक पूल नागरिकांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात ८१ मोठ्या पुलांबरोबरच ७५३ लहान पूल आहेत. 

शंभर वर्षांचे पूल

- मावळ तालुक्यातील सदुंबरे गावाजवळील पूल

- चाकण-तळेगाव रस्त्यावरील सुधा नदीवरील दोन पूल

- भीमा नदीवरील कोरेगाव-भीमा येथील पूल

- बारामतीतील मदनवाडी ओढ्यावरील पूल

- नीरा डावा कॅनॉलवरील तीन पूल

Web Title: Inspect bridges in Pune district, instructions from Chief Engineer of Public Works Department Atul Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.