धायरीत पतीच्या मारहाणीत पत्नीच्या कानाचा पडदा फाटून इजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:00 IST2021-11-02T14:54:29+5:302021-11-02T15:00:08+5:30

पुणे : घरगुती कारणावरुन तसेच हुंडा दिला नाही म्हणून वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करताना पतीने इतके जोरात मारले की ...

injury wife eardrum beating her husband dhayari crime news | धायरीत पतीच्या मारहाणीत पत्नीच्या कानाचा पडदा फाटून इजा

धायरीत पतीच्या मारहाणीत पत्नीच्या कानाचा पडदा फाटून इजा

पुणे : घरगुती कारणावरुन तसेच हुंडा दिला नाही म्हणून वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करताना पतीने इतके जोरात मारले की त्यात पत्नीच्या कानाचा पडदा फाटून गंभीर इजा झाली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी जावेद मुल्ला (वय ३१, रा. रायकरनगर, धायरी) याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहितेचा २७ एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत छळ केला जात होता. लग्नात हुंडा दिला नाही, तसेच घरगुती कारणावरुन तिला वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. फिर्यादी यांचे स्त्री धनही स्वत:कडे ठेवून घेतले. जावेद मुल्ला याने मारहाण करताना फिर्यादी यांच्या कानावर इतका जोरात फटका मारला की त्यामुळे कानाचा पडदा फटून इजा झाली. त्यासाठी ते डॉक्टरांकडे गेले. तेव्हा पोलिसांत तक्रार केली तर बघुन घेईल, अशी धमकी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे तपास करीत आहेत.

Web Title: injury wife eardrum beating her husband dhayari crime news