खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती ;निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 06:10 PM2020-02-26T18:10:41+5:302020-02-26T18:15:26+5:30

इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. यावेळी  त्यांनी नर्मविनोदी शैलीत प्रबोधन करत कीर्तन केल्याचे दिसून आले.

Indurikar Maharaj Express His Disappointment Through His Speech | खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती ;निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची खंत 

खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती ;निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची खंत 

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यात कोथरूडमध्ये संपन्न झाले कीर्तन खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती 

पुणे : खरं बोललो की किती त्रास होते हे आम्हालाच माहिती अशा शब्दात मागील काही दिवसांपासून  असणाऱ्या वादावर  ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल असे सांगायलाही ते विसरले नाहीत. पुण्यातील कोथरूडमध्ये ते तुळजाभवनी माता व राधाकृष्ण सेवा संस्थेच्या राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. या कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. 

इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. यावेळी  त्यांनी नर्मविनोदी शैलीत प्रबोधन करत कीर्तन केल्याचे दिसून आले.

या कीर्तनात ते म्हणाले की, 'जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही. मात्र आजकालच्या व्यक्तींना संत म्हणता येत नाही. भाकरी ऐवजी सफरचंद खातो आणि लग्न करण्याऐवजी टिकटॉक बघतो तो संत नसून भामटा आहे. सध्याच्या काळात आईवडील हेच देव आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे चांगले दिवस आलेत हे मुलांनी विसरता कामा नये. ज्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असते आणि ज्याची धर्मावर निष्ठा असते ती व्यक्ती कायम सुखी असते. 

वारकरी संप्रदायाबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'वारकरी आहेत म्हणून जग सुरु आहे. आज जगात चुकीची कामे करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे पण, अशा वातावरणातही संतवचने, भागवतकथा, रामायणकथा सारख्या विचारांवर जग टिकून आहे. या काळात संवाद कमी होत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. याबाबत ते म्हणाले की,  टिकटॉक, पब-जी च्या आहारी मुले आणि मोबाईलच्या आहारी पालक गेल्यामुळे सुसंस्कार नसलेला नवा समाज जन्मत आहे. ज्ञान हा साऱ्या विद्यांचा पाया असून त्याची आराधना करण्याची गरज आहे'. 

कीर्तनासाठी विशेष पोलीस बंदोबस्त 

मागील काही दिवसांपासून इंदोरीकर महाराज हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला गर्दी होणार हे निश्चित होते. मात्र या गर्दीतून कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून कीर्तनाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. 

Web Title: Indurikar Maharaj Express His Disappointment Through His Speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.