इंद्रायणीला महापूर; भक्ती सोपान पुल व पुंडलिक मंदिर पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 23:43 IST2025-05-26T23:42:59+5:302025-05-26T23:43:11+5:30
इंद्रायणी नदी काठचा दगडी घाट पाण्याखाली गेला आहे. सिध्दबेट येथील जुना बंधारा पूर्ण भरून त्यावरून पाणी नदी पात्रात पडत आहे. मागील तीन - चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाल्याचे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होताना दिसून येत आहे.

इंद्रायणीला महापूर; भक्ती सोपान पुल व पुंडलिक मंदिर पाण्याखाली
भानुदास पऱ्हाड
आळंदी : इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीची दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. नदीच्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला आहे. नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. तर भक्त पुंडलिक मंदिरही पाण्यात गेले आहे.
इंद्रायणी नदी काठचा दगडी घाट पाण्याखाली गेला आहे. सिध्दबेट येथील जुना बंधारा पूर्ण भरून त्यावरून पाणी नदी पात्रात पडत आहे. मागील तीन - चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाल्याचे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान भाविक तसेच नागरिकांना इंद्रायणी घाटाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली असून आवश्यक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. पोलीस व नगरपालिका प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सतर्कता बाळगून असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.