इंद्रायणी एक्स्प्रेस शनिवार, रविवारी पुण्यापर्यंतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 07:03 IST2019-04-05T07:02:07+5:302019-04-05T07:03:25+5:30

दौंड ते सोलापूरदरम्यान मेगाब्लॉक

Indrayani Express on Saturdays, till Pune on Sunday | इंद्रायणी एक्स्प्रेस शनिवार, रविवारी पुण्यापर्यंतच

इंद्रायणी एक्स्प्रेस शनिवार, रविवारी पुण्यापर्यंतच

पुणे : दौंड ते सोलापूर स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी ३१ मेपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी पुणे ते सोलापूरदरम्यान धावणारी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. या ब्लॉकचा इतर गाड्यांवरही परिणाम होणार आहे.

ब्लॉकमुळे सोलापूर ते पुणे डेमू गाडी प्रत्येक शनिवार व रविवारी कुर्डुवाडीपर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे पुणे-सोलापूर डेमू गाडी भिगवणपर्यंत सोडणार आहे. पुणे ते हैद्राबाद एक्स्प्रेस ही गाडी दर शनिवारी पुणे ते कुर्डुवाडीपर्यंत रद्द केली असून ही गाडी कुर्डुवाडी स्थानकातून नियमित वेळापत्रकानुसार धावेल. तसेच ही गाडी सोमवार व बुधवारी वेळापत्रकानुसार पुण्यातून सुटेल. हैद्राबाद-पुणे गाडीही दोन दिवस कुर्डुवाडीपर्यंत धावणार आहे.

Web Title: Indrayani Express on Saturdays, till Pune on Sunday