Indian Railway : बिलासपूर विभागातील कामांमुळे आझाद हिंद, दुरांतो एक्स्प्रेस रद्द
By नितीश गोवंडे | Updated: September 21, 2022 19:35 IST2022-09-21T19:30:55+5:302022-09-21T19:35:01+5:30
२१ ते २८ सप्टेंबर दरम्यान या मार्गावरील विविध रेल्वे रद्द...

Indian Railway : बिलासपूर विभागातील कामांमुळे आझाद हिंद, दुरांतो एक्स्प्रेस रद्द
पुणे : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागाच्या रायगड - झारसुगुडा रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. याचा परिणाम पुण्याहून सुटणाऱ्या काही एक्स्प्रेसवर पडला आहे. २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान या मार्गावरील विविध रेल्वे रद्द राहणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने १२१२९ आणि १२१३० पुणे - हावडा - पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान रद्द राहणार आहे. यासह २२, २४ आणि २९ सप्टेंबर रोजी १२२२२ हावडा - पुणे दुरांतो एक्स्प्रेस यासह २४, २६ आणि १ ऑक्टोबर रोजी रवाना होणारी १२२२१ पुणे - हावडा दुरांतो एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
२३ आणि २६ सप्टेंबर रोजी २२८४६ हटिया - पुणे एक्स्प्रेस तसेच २५ आणि २८ सप्टेंबर रोजी रवाना होणारी २२८४५ पुणे - हटिया एक्स्प्रेस रद्द असणार आहे. या एक्स्प्रेससह २४ सप्टेंबर रोजी २०८२२ संतरागाछी - पुणे एक्स्प्रेस आणि २६ सप्टेंबर रोजी रवाना होणारी २०८२१ पुणे - संतरागाछी एक्स्प्रेस देखील रद्द राहणार आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.