शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

कॅलिफाेर्नियातील जंगलात लागलेल्या अागीमुळे भारतीयांबराेबर पुण्यातील विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 14:29 IST

कॅलिफोर्नियातील परॉडाईज येथील जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यु झाला असून ६ हजार ७१३ घरे भस्मसात झाली आहेत.

पुणे : कॅलिफोर्नियातील परॉडाईज येथील जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यु झाला असून ६ हजार ७१३ घरे भस्मसात झाली आहेत. आतापर्यंत ५२ हजार नागरिकांना परिसरातून हलविण्यात आले आहे. या परिसरात विद्यार्थी, कामगार म्हणून जवळपास हजाराहून अधिक भारतीय रहात आहेत. त्यांचे प्रशासनाने स्थलांतर केले असल्याने त्यांचे पुणे व महाराष्ट्रातील पालक चिंतेत पडले आहेत. 

    परॉडाईज परिसरात ९० हजार एकरावरील जंगलात ही आग लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकन प्रशासन ती विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु, त्याला अद्याप यश आलेले नाही. या परिसरात जवळपास हजाराहून अधिक भारतीय राहत आहेत. तर पुण्यातील २० ते ३० विद्यार्थी, आयटी तरुण राहतात़ येथील हॉटेल, आय टी कंपन्यांमध्ये अनेक भारतीय काम करतात. अमेरिकी नादरीकांप्रमाणे या भारतीयांनाही स्थलांतर करावे लागले आहे. याबाबत तेथील आय टी कंपनीत नोकरी करणारे पुण्यातील तनय खांडके यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून ही आग लागली असून वेगाने पसरत आहे. आम्ही परॉडाईजपासून १४ मैलावर असलेल्या चिकी शहरात राहतो. पुण्यातील २० जण येथे राहतो़. या आगीत मोठ्या प्रमाणावर घरे व इमारती जळून खाक झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून येथील सर्व शाळा, महाविद्यालये, आॅफिसेसना सुट्टी दिली आहे. येथून जाणारा महामार्ग संपूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. सर्व जण घरी बसून असून तुम्हाला केव्हाही बाहेर पडावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आम्ही महत्वाचे सर्व सामान बांधून ठेवून तयारीत थांबलो आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून या आगीमुळे सूर्यदर्शन असे झालेले नाही. परिसरात सर्वत्र धूर आणि धूर दिसून येत आहे. आगीतून उडणाऱ्या राखेमुळे सर्वत्र राखेचा पाऊस पडल्या सारखे दिसत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री पहाटे तीन वाजेपर्यंत आम्ही जागेच होताे. शनिवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) आग अजून वाढली नाही़. त्यामुळे आम्हाला घरातच थांबून आहोत. बाहेर हवा खूप खराब आहे. अगदी ३०० मैलांपर्यंत सर्वत्र धूर आणि धूरच दिसत असल्याचे तनय खांडके याने सांगितले. 

    त्या परिसरात राहणाऱ्या अनेकांचे पालक पुणे, मुंबई, महाराष्ट्रात आणि देशात आहेत. परॉडाईज परिसरात राहणाऱ्या अनेकांना स्थलांतर करावे लागल्याने त्यांचे पालक सतत त्यांच्याशी संपर्कात असून ते मुलाच्या काळजीने चिंतेत सापडले आहेत. अमेरिकेतील न्यूज चॅनेलवरील बातम्या पाहून ते तेथील परिस्थितीची माहिती घेत आहेत. दरम्यान स्थलांतरीत लाेकांची राहण्याची व्यवस्था चर्च तसेच महाविद्यालयांच्या मैदानावर तंबू ठाेकून करण्यात अाली अाहे. तसेच सध्या तेथे 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली अाले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाfireआगforestजंगलStudentविद्यार्थी