corona virus'ची खबरदारी घेण्यास सुरुवात ; देशभरातील विमानतळांवर तपासणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 15:45 IST2020-01-24T15:44:57+5:302020-01-24T15:45:53+5:30
चीनमध्ये सुरुवात झालेला करोना व्हायरसचा भारतात प्रवेश होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सात विमानतळांवर चीन आणि आसपासच्या प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली आहे

corona virus'ची खबरदारी घेण्यास सुरुवात ; देशभरातील विमानतळांवर तपासणी सुरु
पुणे : चीनमध्ये सुरुवात झालेला करोना व्हायरसचा भारतात प्रवेश होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सात विमानतळांवरचीन आणि आसपासच्या प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने याविषयी माहिती दिली आहे. यात मुंबईसह, दिल्ली व कोलकाता या आंतरराष्ट्रीय विमानतळांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत १हजार सातशे एकोणचाळीस प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी मुंबई येथे दोन रुग्णांना सौम्य सर्दी व ताप असल्याने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातही करोना संशयित रुग्णांना भरती कारण्यासाठी पुण्यात नायडू रुग्णालय व मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात आवश्यक ती उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत निदानाची सुविधा उपलब्ध आहेत. संशयित रुग्णांचे नमुने या प्रयोगशाळेत पाठवावेत. रुग्णालय स्तरावर संसर्ग प्रतिबंध यंत्रणा कार्यरत करणे आवश्यक आहे. यादृष्टीने रुग्णालयांची तयारी आणि विलगीकरण कक्ष सुसज्ज ठेवावेत. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटीलेटर, जीवनावश्यक प्रणाली सुविधा कार्यरत राहतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.