प्रजासत्ताक दिनाला पोलिसाने फडकविला मक्का मदिना येथे तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 13:51 IST2020-01-27T13:47:27+5:302020-01-27T13:51:31+5:30
सौदी अरेबियात केला प्रजासत्ताक दिन साजरा

प्रजासत्ताक दिनाला पोलिसाने फडकविला मक्का मदिना येथे तिरंगा
वाकड : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस शिपायाने सातासमुद्रापार जाऊन सौदी अरेबियातील मक्का मदिना या मुस्लिम धार्मिक स्थळी प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्याच्या या देशभक्तिने सर्वांची मान अभिमानाने उंचावली असून पोलीस खात्यातून त्याचे कौतुक होत आहे.
सुरज शौकत सुतार असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते सहकुटुंबीय गेल्या २१ तारखेला सौदीतील मक्का मदीना या मुस्लिम धर्मातील पवित्र स्थळांच्या यात्रेवर रवाना झाले होते. मात्र ,येत्या प्रजासत्ताक दिनी आपण मातृभूमी असलेल्या आपल्या भारत देशात नसणार असल्याची जाणीव सुतार कुटुंबियांना होती. याची कल्पना असल्याने त्यांनी आपल्या देशाचा तिरंगा सोबत नेला होता. ठरल्याप्रमाने २६ जानेवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास आपला तिरंगा फडकवित त्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला.