शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

Maratha Kranti Morcha: ‘सारथी’समोर तारादुतांचे आजपासून बेमुदत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 2:10 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार महिने पूर्ण होत आले तरी तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही.

ठळक मुद्दे विविध मराठा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चाचा आंदोलनाला पाठिंबा

पुणे : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शाश्वत विकासासाठी, सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तारादूत प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी १९ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार महिने पूर्ण होत आले तरी तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही. त्यामुळे आजपासून (बुधवार) सारथीच्या कार्यालयासमोर (Sarthi)  राज्यातील विविध भागातील ज्या तारादुतांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे. ते सर्व तारादूत, विविध मराठा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पुणे समन्वयक सचिन आडेकर यांनी दिली.

सचिन आडेकर म्हणाले, ''१९ जून २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवराज छत्रपती संभाजीराजे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक आणि तारादूत प्रतिनिधी त्याचबरोबर सारथीच्या संचालक मंडळाबरोबर बैठक झाली होती. त्या बैठकीत अजित पवार यांनी तारादूत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश सारथीच्या संचालक मंडळाला दिले होते. मात्र, चार महिने हाेत आले तरी तारादूत प्रकल्पाबाबत अद्यापही काहीच हालचाली सुरू झाल्या नाहीत.''

''उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत. तरीही सारथीच्या संचालकांनी मंत्रालयात तारादुतांचा प्रस्ताव पाठवला आहे. तो चुकीचा आहे. मुळात प्रस्तावाची आवश्यकता नाही. तरीही प्रस्ताव देऊन तीन महिने उलटले तरी काहीच निर्णय होत नाही. प्रकल्प तात्काळ सुरू करून सर्व प्रशिक्षीत तारादुतांना सारथी अंतर्गत अथवा बाह्य स्त्रोतामार्फत नियुक्त्या द्याव्यात. या मागणीची अद्याप दखल घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व भागातील तारादूत आजपासून (बुधवार) सारथीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.''

टॅग्स :PuneपुणेmarathaमराठाAjit Pawarअजित पवारMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा