Pune Crime: ११ वर्षीय विद्यार्थिनीशी रिक्षाचालकाकडून अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 12:15 IST2024-05-04T12:14:52+5:302024-05-04T12:15:42+5:30
पीडिता रिक्षात एकटी असल्याची संधी साधत एका महाविद्यालयाजवळ रिक्षा थांबवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला...

Pune Crime: ११ वर्षीय विद्यार्थिनीशी रिक्षाचालकाकडून अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल
पुणे : शालेय विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाविरोधात अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास शिंदे (३५, रा. कलवड, लोहगाव) असे रिक्षाचालक आरोपीचे नाव आहे.
बुधवारी (ता. १) सकाळी सातच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी (११ वर्षे ८ महिने) ही नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी रिक्षाने निघाली. रिक्षा चालकाला संबंधित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असताना देखील त्याने पीडिता रिक्षात एकटी असल्याची संधी साधत एका महाविद्यालयाजवळ रिक्षा थांबवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
तिचे फोटो काढण्याच्या उद्देशाने गालाला वाईट हेतूने गाल लावून अश्लील चाळे केले. यानंतर रक्षा पुढे नेत चंदननगर येथील साईबाबा कमानीसमोर पीडितेला स्वत:च्या शेजारी बसवत अश्लील स्पर्श करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मेढे करत आहेत.