इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार - हर्षवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:37 IST2018-05-06T02:37:01+5:302018-05-06T02:37:01+5:30
इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल, असे वक्तव्य आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार - हर्षवर्धन पाटील
इंदापूर : इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल, असे वक्तव्य आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले. राजकीय लढाईला प्रारंभ झाल्याचे संकेत त्यांनी दिले.
पाटील म्हणाले, की आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी जे वक्तव्य केले ते त्यांच्या पक्षाचे मत होते; काँग्रेस पक्षाचे नव्हते. पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अथवा धोरण वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. ते फक्त एका इंदापूरच्या जागेपुरते मर्यादित नसेल. ज्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून ते निश्चित होणार आहे.
ते पुढे म्हणाले, की कालच्या विधान परिषदेच्या जागावाटपामध्ये लातूरला काँग्रेसचा विद्यमान आमदार असताना, स्थानिक अडचणींमुळे ती जागा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला दिली.
परभणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होता. ती जागा काँग्रेसला देण्यात आली. महाराष्ट्रात विधानसभेचे २८८ व लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. जास्तीत जास्त जागा मिळवून सत्ता आणण्याला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे त्यानुसारच जागावाटप होईल.