शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्याला मिळणार चार आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 13:37 IST

उन्हाळी आवर्तन बैठकीनंतर निर्णय होणार

ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासून ३० दिवसांचे आवर्तन देणारमागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळ्यात केवळ एकच आवर्तन

पुणे : शेटफळ मध्यम प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील काही गावांना रब्बीसाठी एक आणि उन्हाळी तीन अशी चार आवर्तने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एक फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, समितीचे सदस्य सचिव विजय यादव, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भोंडणी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हंगे, आरेखक पांडुरंग कटक या वेळी उपस्थित होते.शेटफळ मध्यम प्रकल्पाची क्षमती ६२० दशलक्ष घनफूट आहे. या प्रकल्पाअंतर्गत १९२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. शेटफळ, भोंडणी, बावडा, नीर-निमगाव, सराटी, लुमेवाडी, गोंडी, पिंपळी, ओझर या गावासह नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, नऊ पाणी वापर संस्थांसह सुमारे ६३ नवीन आणि जुन्या ठिंबक सिंचन योजना या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येतात. मागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळ्यात केवळ एकच आवर्तन दिले होते. मागील वर्षी नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात अवर्षणजन्य स्थिती होती. त्यामुळे खरीप हंगामात शेटफळ तलाव भरता आला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात देखील कमी पाणी राहिले होते. शेटफळ तलावातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापरा करावा, उपलब्ध पाणी साठ्यानुसार हंगामनिहाय पीक रचना, पीक कार्यक्रम निश्चित करण्यात यावे, लाभक्षेत्रात बारमाही पिकांसाठी सिंचन व तुषार योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्या, पाण्याची गळती थांबवावी, वितरिकांची दुरुस्ती करावी, अशा सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. .........उन्हाळी आवर्तन बैठकीनंतर निर्णय होणारसिंचन आवर्तनाचा कालवधी ३० दिवसांचा असणार आहे. वितरिकांमधून ५० क्युसेकने पाणी सोडण्यात येईल. उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी रब्बीचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात येईल. त्यात उन्हाळी आवर्तनाचा अंतिम निर्णय होईल. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीagricultureशेती