शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालखी स्वागतासाठी इंदापूर सज्ज

By admin | Updated: June 27, 2017 07:42 IST

संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी इंदापूरनगरी सज्ज झाली आहे. पालखी मुक्कामातील आकर्षणाचा केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी इंदापूरनगरी सज्ज झाली आहे. पालखी मुक्कामातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या रिंगण सोहळ्याचे मैदानही अश्वांच्या टापा झेलण्यास तयार झाले आहे.उद्या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रतिवर्षाप्रमाणे इंदापूर-बारामती रस्त्याने संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचे शहरात आगमन होईल. श्रीरामवेस नाक्यावर स्वागत झाल्यानंतर रिंगण सोहळ्याकरिता ती काही काळ नजीकच्या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या पटांगणात थांबणार आहे. त्यानंतर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमधील पटांगणात विश्रांतीसाठी जाईल. त्या ठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव मुकुंद शहा, सहसचिव अ‍ॅड. मनोहर चौधरी, विलासराव वाघमोडे आदींनी आज त्या ठिकाणची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी जातीने लक्ष घालून नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व शहर स्वच्छ करून घेतले आहे. मुक्काम आटोपून पालखी इंदापुरातून अकलूजकडे निघते. त्या प्रस्थानाच्या मार्गाच्या दुतर्फा असणारी अस्वच्छता, ज्योतिबाच्या माळालगतच्या मोकळ्या जागेत असणारा कचरा डेपो, दुर्गंधी यामुळे गेल्या दोन वर्षांत वारकऱ्यांमध्ये नाराजी होती. ती भावना लक्षात घेऊन नगर परिषदेने रस्त्याच्या दुतर्फा अत्तर फवारून, कनात बांधून प्रसंग निभावून नेला होता.यंदा मात्र नगर परिषदेने विक्रमी वेळेत कचरा डेपोभोवती संरक्षक भिंत बांधून घेतली. रस्त्याची दुरुस्ती व स्वच्छता करून या प्रश्नाचा कायमचा निकाल लावला आहे.