इंदापूरात सावकाराने २ लाख अन् २२ गुंठे शेतजमीन जबरदस्तीने घेतले नोटरी करून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 15:02 IST2021-10-17T15:02:39+5:302021-10-17T15:02:49+5:30
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत खासगी सावकाराने दीड लाख रुपयांचे २ लाख ७० हजार रुपये व २२ गुंठे शेत जमीन जबरदस्तीने नोटरी करुन घेवून व्यावसायिकास मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे वालचंदनगर पोलिसांनी खासगी सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.

इंदापूरात सावकाराने २ लाख अन् २२ गुंठे शेतजमीन जबरदस्तीने घेतले नोटरी करून
कळस : इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत खासगी सावकाराने दीड लाख रुपयांचे २ लाख ७० हजार रुपये व २२ गुंठे शेत जमीन जबरदस्तीने नोटरी करुन घेवून व्यावसायिकास मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे वालचंदनगर पोलिसांनी खासगी सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नंदा अरूण पाटोळे व अरूण किसन पाटोळे (रा.दोघे,भरणेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भरणेवाडी येथील प्रकाश भिमराव गायकवाड यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १ जून २०१२ रोजी गायकवाड यांनी घरगुती कारणाकरता पाटोळे यांच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने दीड लाख रुपये घेतले होते.
गायकवाड हे पाटोळे यांना दरमहिन्याला १५ हजार रुपये व्याज देत होते. डिसेंबर २०१३ पर्यंत गायकवाड यांनी दीड लाख रुपयांचे २ लाख ७० रुपये व्याजासहित दिले. गायकवाड यांनी व्याजाचे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर १० लाख रुपये व्याज देण्यासाठी तगादा लावून गायकवाड यांच्या नावावरील २२ गुंठे शेतजमीन जबरदस्तीने नोटरी करुन वहिवाटीस घेतली. याप्रकरणी गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पाेलिसांनी महाराष्ट्र सावकारी कायद्यानूसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.