शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरला दिवसाआड पाणी

By admin | Updated: March 16, 2015 04:19 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात एक ते दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात एक ते दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर, तरंगवाडी तलावाची पाण्याची पातळी खालावल्याने विद्युत पंपाने पाणी खेचून सरस्वतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा भार उजनी पाणलोट क्षेत्रामधील पाणीपुरवठा योजनेवर पडला आहे. परिणामी शहरात उद्यापासून दिवसआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल, असे चित्र आहे.यासंदर्भात उजनी पाणलोट क्षेत्राची ‘लोकमत’ने पाहणी केली. त्या वेळी माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या परिसरातील पाणी नदीपात्रात किमान एक-दीड किलोमीटर पाणीपातळी गेल्याचे दिसून आले. माळवाडी येथील कार्यकर्ते गोकुळ व्यवहारे यांची पाणीपुरवठा योजनेजवळच जमीन आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले, की नेहमी पाणलोट क्षेत्रातील पाणी आमच्या जमिनीपर्यंत असते. यंदा ते एक ते दीड किलोमीटर आत सरकले आहे. ऐन उन्हाळ्यात ते आणखी आत सरकेल. त्या वेळी परिस्थिती अधिक बिकट होईल.पाणीपुरवठ्यासंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पाणीपुरवठ्याबाबत सत्तारूढ व विरोधी दोन्ही बाजूच्या बहुतांशी नगरसेवकांना काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. विरोधी गटातील नगरसेवक गजानन गवळीदेखील गप्प का आहेत, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)