शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरावर वाढतोय स्थलांतरितांचा भार

By admin | Updated: August 2, 2014 04:07 IST

रोजगारासाठी येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या प्रत्येक पाच वर्षांनी एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के वाढत आहे

पुणे : गेल्या दशकभरात वेगाने वाढणारे शहर आणि शहराच्या परिसरासत वाढणाऱ्या उद्योगांच्या संख्येमुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या प्रत्येक पाच वर्षांनी एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के वाढत आहे. त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात भर पडल असली तरी, या वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक सुविधांवर ताण येण्याबरोबरच त्याचे पर्यावरण आणि झोपडपट्ट्यांची वाढही शहरात मोठ्या प्रमाणात झाली आहे. या शिवाय शहराच्या वाहतूक समस्येवरही गंभीर परिणाम होत आहे. महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही बाब समोर आली आहे. केंद्र शासनाने १९९0 च्या दशकात नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे शहराच्या परिसरात वेगाने बदल झाले. नवीन उद्योग, व्यवासाय, माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्या (आयटी) क्षेत्र, वाहन उद्योग, हॉटेल व्यवसाय, शहरात मोठ्या प्रमाणात वाढला. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणत रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. परिणामी शहरात स्थलांतरितांची संख्या १९९0 नंतर झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. यातील अनेक जण पुण्यातच स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची लोकसंख्याही वाढत आहे. १९८१ ते ९१ या दशकभरात शहरात स्थलांतर करणारी लोकसंख्या ३ लाख १0 हजार होती. मात्र, त्यानंतर आयटी क्षेत्राची वाढ वेगाने होऊ लागल्याने १९९१ ते २00१ या कालावधीत ही संख्या लोकसंख्येच्या तब्बल ३२ टक्के इतकी वाढली आहे. तर २00६ ते २0११ मध्ये एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के वाढली आहे. (प्रतिनिधी)