शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूची वाढली तीव्रता

By admin | Updated: March 9, 2015 00:53 IST

शहरात स्वाइन फ्लूच्या अकराव्या बळीची रविवारी नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक चौघांचे प्राण गेले आहेत.

पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूच्या अकराव्या बळीची रविवारी नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक चौघांचे प्राण गेले आहेत. स्वाइन फ्लूचे संकट अजूनही दूर होत नसल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. उन्हाळ्याची सुरुवात झालेली असतानाही मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आतापर्यंतचे सर्वाधिक चार जणांचे बळी स्वाइन फ्लूने घेतले आहेत. त्यातील तीन महिला आहेत. दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. यामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग झपाट्याने फैलावत असल्याचे दिसत आहे. जोनिका भरतकुमार पटेल (वय ४०, रा. मोशी प्राधिकरण) असे स्वाइन फ्लूने मरण पावलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे. येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांना ३ मार्चला दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी ४ मार्चला दुपारी साडेचारला त्यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी त्याच्या थुंकीचे नमुने वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शनिवारी, ७ मार्चला त्यांना स्वाइन फ्लूचे झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले. शहरात या आजाराने बळी गेलेल्या त्या अकराव्या रुग्ण आहेत. एका आठवड्यातील हा चौथा बळी आहे. स्वाइन फ्लूमुळे खडकीतील ५५ वर्षांच्या महिलेचा १ मार्चला, वाकडमधील ३२ वर्षांच्या तरुणाचा ३ मार्चला आणि स्पाइन रोड, मोशी येथील ४५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू दुसऱ्या दिवशी ४ मार्चला झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. नव्या वर्षापासून स्वाइन फ्लूची लागण होण्याचे प्रमाण दिसू लागले. आजाराने २१ जानेवारीला पिंपळे गुरव येथील ४१ वर्षांच्या व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तो शहरातील पहिला मृत्यू होता. पाठोपाठ तळेगाव दाभाडेतील तरुणाचा मृत्यू झाला. जानेवारीत या आजाराने दोघे मरण पावले.फेब्रुवारीत आजाराची तीव्रता वाढत गेली. एकूण ५ जणांचा मृत्यू या महिन्यात झाला. १ तारखेला आंध्रप्रदेश येथील ४८ वर्षांच्या आणि पिंपळे निलख येथील ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. चिंचवडच्या ३४ वर्षीय तरुणाचा १३ तारखेला मृत्यू झाला. १८ तारखेला खेड तालुक्यातील मरकळ येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मोहननगर, चिंचवड येथील ५९ वर्षांच्या व्यक्तीचा अंत झाला. या व्यतिरिक्त पुण्यातील रुग्णालयात पिंपरी-चिंचवडचे तीन रुग्ण उपचारादरम्यान मरण पावले आहेत. जाहीर कार्यक्रमात आणि गर्दीच्या ठिकाणी जाणीवपूर्वक मास्क लावला जात आहे. देहूगावात शनिवारी झालेल्या संत तुकाराममहाराज बीज सोहळ्यात मास्क लावलेले भक्त वावरत होते. तसेच, पोलीस आणि शासकीय कर्मचारी मास्क लावून काळजी घेत होते. सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच शिवजयंती कार्यक्रमातही मास्कचा वापर करणारे अनेक जण होते. रुग्णालयात रुग्णास भेटण्यास जाणारे नातेवाईक आणि मित्रमंडळी आवर्जून तोंडास मास्क लावण्याची दक्षता घेतात. दुचाकी वाहनचालकही तोंडास मास्क किंवा रुमाल बांधून वावरत आहेत. वैद्यकीय विभागाने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.(प्रतिनिधी)