शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांमध्ये गर्भाशयाला होणाऱ्या फायब्रॉईडमध्ये वाढ

By admin | Updated: July 6, 2015 05:19 IST

दिवसेंदिवस बदलत असणारी जीवनशैली आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीला होणाऱ्या विकारांचे प्रमाण वाढत आहे.

पुणे : दिवसेंदिवस बदलत असणारी जीवनशैली आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीला होणाऱ्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर हे गर्भपिशवी काढावी लागण्याचे पहिले महत्त्वाचे कारण असून, गर्भाशय पिशवीला येणाऱ्या फायब्रॉईडच्या गाठी हे दुसरे महत्त्वाचे कारण असल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.त्या म्हणाल्या, की वयाच्या चाळिशीनंतर मासिक पाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल, पोट सहन न होण्याइतके दुखत असेल तर त्यावर गरजेनुसार उपचार केले जातात. तरीही हा आजार आटोक्यात आला नाही तर अगदी शेवटचा उपाय म्हणून गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो. ही पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया सामान्य नसून, त्यात रुग्णाची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. परंतु शस्त्रक्रियेनंतर मात्र रुग्ण महिला अतिशय सामान्य जीवन जगू शकते. आता आरोग्याबाबत जागरूकता वाढली असल्याने रुग्णांमध्ये एकूणच आजारांबाबतचे निदान वेळेत होते. त्यामुळे विशिष्ट समस्येवर वेळीच उपचार करणे शक्य होते. अन्यथा, पूर्वी मासिक पाळीमध्ये अतिरक्तस्राव होऊन महिलांमध्ये अ‍ॅनिमिया होण्याचे प्रमाण जास्त होते. तसेच हा त्रास कोणत्याही उपचाराविना सहन केला जात असे. आता त्याबाबत माहिती झाल्याने उपचारांसाठी महिला पुढे येताना दिसत आहेत आणि अशा प्रकारची जागृती आणखी वाढायला हवी, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. धनश्री शेणोलीकर म्हणाल्या.गर्भाशय पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे असे चित्र आहे. याबाबत योग्य ती जागरूकता निर्माण झाल्यामुळे स्त्रियांचे जीवनमान सुसह्य होणार असेल तर डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया करण्यात कोणतीही अडचण नाही. - डॉ. वैजयंती पटवर्धन, स्त्रीरोगतज्ज्ञकॅन्सर आणि फायब्रॉईडच्या गाठी होण्याचे नेमके आणि ठोस कारण सांगता येत नाही. तरीही फायब्रॉईड होण्यामागे लग्नाचे वाढते वय, पहिले मूल उशिरा होण्याचे वाढते प्रमाण आणि एक किंवा दोन ही अपत्यांची कमी असणारी संख्या ही कारणे प्रामुख्याने सांगता येऊ शकतात. याबरोबरच गर्भाशयाच्या पिशवीला सूज येणे आणि काही संसर्ग अशीही ही पिशवी काढावी लागण्याची वेगवेगळी कारणे सांगता येऊ शकतात. - डॉ. धनश्री शेणोलीकर, स्त्रीरोगतज्ज्ञ