शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

देहूगावातील घटना! बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 10:34 IST

तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला बोलावण्यात आले आहे

ठळक मुद्दे तरुणाला वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू

देहूगावः किन्हई- बोडकेवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. आदेश सुरेश हगवणे (वय १७ वर्षे रा. विठ्ठलनगर, देहूगाव) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवार पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे आणि त्यांचे पथक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला बोलावण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश हगवणे व आणखी चार जण असे पाच जण पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी बोडकेवाडी येथील बंधाऱ्यावर आले होते. सध्या मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी मध्ये मावळातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह या भागात वेगाने वाहत आहे. आदेशला या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूPoliceपोलिसWaterपाणीDeathमृत्यू