पुण्याच्या कासेवाडीतील घटना! दिरानेच केला भावजयीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:33 IST2021-07-04T19:33:10+5:302021-07-04T19:33:17+5:30

पतीबरोबर वाद झाल्याने माहेरी गेलेल्या भावजयला सासरी आणण्यासाठी आलो असल्याचा बहाणा सांगितला

Incident in Kasewadi, Pune! Dirane raped Bhavjayi | पुण्याच्या कासेवाडीतील घटना! दिरानेच केला भावजयीवर बलात्कार

पुण्याच्या कासेवाडीतील घटना! दिरानेच केला भावजयीवर बलात्कार

ठळक मुद्देदिराने खोटे सांगून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला

पुणे: पतीबरोबर वाद झाल्याने माहेरी गेलेल्या भावजयला सासरी आणण्यासाठी आलो आहे. असा बहाणा करुन दिरानेच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी रामटेकडी येथे राहणाऱ्या २४ वर्षाच्या विवाहितेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या २६ वर्षाच्या दिरावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना कासेवाडी येथे १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली होती.

विवाहितेचे पतीबरोबर वाद झाले. त्यातून त्या कासेवाडी येथे आपल्या आईकडे राहायला आल्या होत्या. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांचा दीर त्यांच्या आईकडे आला. त्याने सासरी घेऊन जाण्यासाठी आलो असे खोटे सांगितले. त्यावर त्यांनी त्याला घरात घेतले. तेव्हा दिराने त्यांचे तोंड दाबून काय बोलायचे नाही. आरडा ओरडा केला तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. आपल्या घरात कोणाला सांगायचे नाही. सांगितले तर तुझी इज्जत जाईल, असे म्हणून विवाहितेला व तिच्या आईला जीवे मारुन टाकेन अशी धमकी दिली. विवाहितेने जीवाच्या भितीने इतके दिवस फिर्याद दिली नव्हती. 

Web Title: Incident in Kasewadi, Pune! Dirane raped Bhavjayi